आमदार सुधाकर अडबाले यांचे गौरवोदगार
चुनाभट्टी येथील दीपोत्सव कार्यक्रमात मान्यवरांनी अनुभवली स्वच्छतेची अनुभूती
चंद्रपूर
. आपल्याला अलीकडच्या काळात स्वच्छतेचे महत्व कळाले आहे.मात्र छत्तीसगडी बांधवात ही परंपरा पूर्वीपासून आहे. घरांची व आपल्या परिसरांची स्वच्छता ते आजही करत आहेत. याची अनुभूती वस्तीत फिरताना आली.घरांची स्वच्छता ठेवल्याने मन प्रसन्न राहते.आरोग्य निरामय होते. छत्तीसगडी बांधवांच्या आदरातिथ्याने आपण भारावलो आहे.छत्तीसगडी बांधवांची स्वच्छतेची संकल्पना सर्वांना प्रेरणादायी आहे,असे गौरवोदगार विधानपरिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांनी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या हद्दीतील चुनाभट्टी येथील दीपोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील राजकीय व सामाजिक नेते रामभाऊ टोंगे व मित्र परिवारा तर्फे मागील तीन वर्षांपासून स्वच्छतेचे माहेर घर असलेल्या चुनाभट्टी वसाहतीत दीपोत्सव व स्नेहमिलन सोहळा घेत आहेत.या सोहळ्याचे उदघाटन आमदार अडबाले यांच्या हस्ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीप प्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य होते. उदघाटक आमदार सुधाकर अडबाले, प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर सैनिक स्कूलचे प्रशासनिक अधिकारी लेफ्ट देबाशिश जेना, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे, बामणी (दुधोली) चे सरपंच प्रल्हाद आलाम, उपसरपंच सुभाष ताजने, चंद्रपूर कृ.उ.बा.स. चे संचालक अरविंद चौरे, किशोर मत्ते, प्रकाश खडके, प्रभाकर सिडाम, माजी संचालक विजय टोंगे, आयोजक रामभाऊ टोंगे यांची व्यासपीठावर उपस्तिथी होती.
. दरम्यान उपस्तिथ मान्यवरांचा स्मुर्तीचिन्ह,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून भावपूर्ण सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी चुनाभट्टी वस्तीत फेरफटका मारून स्वच्छतेची अनुभूती घेतली. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून गावातील महिलांनी स्वागत केले. येथील आदरातिथ्याने मान्यवर चांगलेच भारावले. कार्यक्रमांचे संचालन विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी तर आभार सुभाष भटवलकर यांनी मानले.
चुनाभट्टीची स्वच्छता आधुनिक लोकांना लाजविणारी – लेफ्ट देबाशिश जेना आपली संस्कृती उत्सव साजरे करणारी आहे. येथील नागरिकांनी स्वच्छता संस्कृती जोपासली आहे.परिस्तिथीने गरीब जरी असले, तरी त्यांच्यात प्रामाणिकपणा आहे. घरांची ठेवण व स्वच्छता ग्रीस देशाच्या संस्कृतीची आठवण करून देणारी आहे.हे एका प्रकारे स्वच्छतेचे बेट आहे. यामुळे चुनाभट्टी येथील स्वच्छता आधुनिक युगातील लोकांना लाजविणारी आहे, असे चंद्रपूर सैनिक स्कूलचे प्रशासनिक अधिकारी लेफ्ट. देबशिष जेना यांनी याप्रसंगी भावना व्यक्त केली.
गरजुना मदत व बालकांना खेळणीचे वाटप चुनाभट्टी वस्ती दररोज मोलमजुरी केली,तरच घरातील चुल पेटणार,अशा नागरिकांची आहे.या वस्तीत मागील तीन वर्षांपासून माजी सरपंच रामभाऊ टोंगे व त्यांचा मित्र परिवार दीपोत्सव व स्नेहमिलन सोहळा घेत आहे. येथील नागरिकासी भावनात्मक व आपुलकीचे नाते जपून आहेत. त्यांनी नक्षलग्रस्त भागात कामावर असताना नक्षली हल्ल्यात अंधत्व आलेले धर्मवीर तिवारी,दिव्यांग युवक अंबादास आत्राम व दुर्दर आजाराने पीडित जेष्ठ नागरिक रवि नायर यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम दिली.त्याच प्रमाणे बालक दिनांचे औचित्य साधून बालकांनी खेळणींचे वाटप करून वस्तीतील सर्वांना मायेचा घास भरविण्यात आला.

