आमदार प्रतिभा धानोरकर यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र
वरोरा
. वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी केली आहे.
. पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ट्रेनांचा स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
. या पत्रात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर खालील रेल्वेगाड्यांचा स्टॉपेज सुरु करण्याची मागणी केली आहे : सिंकदराबाद – दानापूर ट्रेन नं. १२७९१ / ९२, ग्रांड ट्रंक एक्सप्रेस ट्रेन नं. १२६१५ / १६, अहिल्यानगरी एक्सप्रेस ट्रेन नं. २२६४५ / ४६, जयपूर एक्सप्रेस ट्रेन नं. १२९७५/७६, राप्ती सागर एक्सप्रेस ट्रेन नं. १२५११ / १२, संघमित्रा एक्सप्रेस ट्रेन नं. १२२९५ / ९६, धनबाद कोल्हापूर दिक्षाभुमी एक्सप्रेस ट्रेन नं. ११०४५/४६, संतरागाछी एक्सप्रेस ट्रे १२७६७/६८ या रेल्वे गाड्यांच्या समावेश आहे.
. या व्यतिरिक्त, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (११४०१-०२) नागपूरपर्यंत, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, बल्लारपूर – वर्धा पॅसेंजर, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस (मुंबईसाठी सीधी ट्रेन सुरू होईपर्यंत) या ट्रेनांचा स्टॉपेज पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

