वासेरा येथे नवजात बाळाचे अर्भक मिळाल्याने उडाली खळबळ
सिंदेवाही
. पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा वासेरा येथे शुक्रवारी एका स्त्री जातीचे नवजात अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मिळाल्याने गावात एकच खळबळ उडाली असून गावातीलच एका महिलेने फेकून दिले असल्याची पोलिसांना माहिती मिळताच तिला ताब्यात घेतले . मात्र महिलेची तब्येत ठीक नसल्याने पोलिसांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार करण्यासाठी भरती केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
. वंशाचा दिवा म्हणून प्रत्येकाना मुलगा हवा आहे. यापोटी अशा कित्येक मुलींना निर्दयी आईवडील गर्भातच मारून टाकत असल्याचे प्रकार घडत असताना वासेरा येथे एका महिलेने आपल्या पाच ते सहा महिन्यांच्या मुलीला मारून गावातीलच पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या खडकाळ जागेत फेकून दिले. याबाबतची माहिती गावातीलच काही व्यक्तींना समजली. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्या नवजात अर्भकाची पाहणी केली असता स्त्री जातीचा अर्भक मृत अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या मृत अर्भकाला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. आणि पुढील चौकशी करण्यात आली. तेव्हा गावातीलच एका महिलेचे नाव पुढे आल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता मला दोन मुली असून त्यानंतर मी आणि माझे पती कुटुंब नियोजन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात यश आले नाही. त्यामूळे मला गर्भधारणा असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे तिच्या विरोधात अपराध क्रमांक २६९/२०२३ भांदवी कलम ३१८ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सागर महल्ले हे करीत आहेत.

