Home विदर्भ गावागावात सभागृह उभारून समाजाचे ऋण फेडणार- आ बंटी भांगडीया

गावागावात सभागृह उभारून समाजाचे ऋण फेडणार- आ बंटी भांगडीया

1193

नेरी येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

तेली समाजाच्या वतीने आ बंटी भांगडीया जोरदार सत्कार तथा स्वागत

नेरी

.          समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावे समाजातील प्रत्येकाला समान सन्मान मिळावा कुणीही वंचित राहू नये गोरगरीब जनतेला सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावागावात सभागृहाची निर्मिती करण्यात येऊन गोरगरीब दिनंदूबळया कुटुंबातील लेकिचे सुसज्ज सभागृहात लग्न मंगलकार्य पारपाडावे यासाठी भांगडीया फौंडेशन नेहमीच कटिबद्ध असून प्रत्येक गावात सभागृह निर्माण करण्याचा मानस आ बंटी भांगडीयानी नेरी येथील संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांच्या सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलून दाखविला
चिमूर विधानसभा क्षेत्रांचे आमदार कीर्तिकुमार (बंटी)भांगडीया यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील नेरी येथे २५१५ योजने अंतर्गत १ कोटी रुपयांच्या संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज अद्ययावत सामाजिक सभागृह बांधकामाचा भूमिपूजन काल दिनांक ५ नोव्हेंबर रात्रौ ला ८ वाजता पी एच सी चौक नेरी येथे पार पडला. जय संताजी युवा मंच, नेरी तसेच समस्त तेली समाज द्वारा सभागृह भूमिपूजन सोहळाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून गणेश तर्वेकर नागभीड तर अध्यक्ष म्हणून महादेव पिसे मान्यवर म्हणून उपस्थित होते.

.          यावेळी आमदारानी समाजबांधवांसह भूमिपूजन स्थळी कुदळ मारून व फलकाचे अनावरण करून संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ केला. कार्यक्रमस्थळी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला व वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले आणि उपस्थित असलेल्या समाजबांधवांना संबोधित केले.तसेच अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करून समाजाची आर्थिक शैक्षणिक तसेच सामाजिक स्थितीवर मार्गदर्शन केले

error: Content is protected !!