Home सामाजिक काकड आरतीच्या स्वराने भक्तिमय वातावरण

काकड आरतीच्या स्वराने भक्तिमय वातावरण

1192

       वासेरा येथे जोपासली जात आहे ५० वर्षापासूनची परंपरा!       

सिंदेवाही 

.              तालुक्यातील वासेरा येथील दिनकर काशिनाथ बोरकर यांचे पुढाकारात मागील पन्नास वर्षापासूनची काकड आरतीची परंपरा जोपासत गावातील महादेव मंदिर येथे पहाटेच्या काकड आरतीच्या स्वराने गावात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

.              कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या दरम्यान सूर्योदयापूर्वी वासेरा येथे मागील पन्नास वर्षांपासून महादेव मंदिरात अनेक भक्त एकत्र येऊन दिंडी भजनाच्या भक्तिरसाने देवाला जागे करून गावात काकड आरतीच्या स्वराने भक्तिमय वातावरण तयार करीत आहेत. असे म्हणतात की, भारतीय संस्कृती अती प्राचीन असून या देशात ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या करून ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे. शिवाय पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या सण उत्सवाचे महत्व जपले आहे. पहाटेला हरिनामाचा जप करून गावात सुख, शांती, समृद्धी, नांदावी, यासाठी गावात कोजागिरी पौर्णिमा पासून काकड आरतीचा प्रारंभ झाला असून रात्रीचा अंतिम प्रहार, आणि दिवसाचा पहिला प्रहार, या दरम्यानच्या काळात सृष्टीचा निर्माता असलेल्या परमेश्वराची ओवाळणी केली जात आहे. आणि भजनाच्या स्वराने गावात भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचे काम दिनकर बोरकर, गुलाब बोरकर, रामचंद्र बोरकर, वासुदेव पुस्तोडे, यशवंत बोरकर, नुकेश्वर सूर्यवंशी, उद्धव बोरकर, विष्णू बोरकर, लहानु बावणे, गणेश बोरकर, प्रभाकर आत्राम, गणपत पुस्तोडे, आत्माराम बोरकर, इत्यादी भक्तगण करीत असून मागील पन्नास वर्षांपासून ची काकड आरतीची परंपरा आजही जोपासल्या जात आहे.

error: Content is protected !!