Home विदर्भ दुष्काळ ग्रस्त यादीतून चिमूर तालुका गायब!

दुष्काळ ग्रस्त यादीतून चिमूर तालुका गायब!

1194

महसूल मंत्रांच्या दौरा ठरला फोल   :   शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

नेरी

.            चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अत्यंत संवेदनशील व राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा समजला जातो.
या हंगामात चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यानं विविध रोग तथा समस्यांनी वेधले व शेतकऱ्यांच्या हातात येणारे पीक पणी जस जमिनीत मिसळून गायब होते त्याच प्रमाणे हातात येणारे पीक गेले. त्यामुळे शेतकरी अत्यंत चिंतेत पडलेला होता.
त्याचीच प्रचिती येत चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित व्हावा अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यातच राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी चिमूर च दौरा केला, अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निरीक्षण केले व शेतकऱ्यांना नुकसाभरपाई देण्यात येईल अशी घोषणा देखील केली होती. त्यामुळे चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित होईल व शेतकऱ्यांना नुकसाभरपाई मिळेल अशी आशा बळावली होती.

.            मात्र दिनाक १० ला काढलेल्या शासन निर्णयाने चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यानं धक्का बसला असून शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरण्याच काम प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी केले असुन शासनाने शेतकऱ्यांची फसगत केल्याचे शेतकरी बोलत आहेत.

.            एकीकडे गाजावाजा करत तालुक्यांत महसूल मंत्री येतात शेतकऱ्यांच्या बांधावर जातात आणि त्याचं तालुक्याचे नाव दुष्काळ ग्रस्त तालुक्यातून गायब होते ही शोकांतिका चिमूर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेली असून महसूल मंत्रांचा दौरा फोल ठरल्याची खंत शेतकऱ्याचा मनात असून शासनाने चिमूर तालुक्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करावं अशी मागणी शेतकरी वर्ग तसे विविध संघटनांनी केलेली आहे.

error: Content is protected !!