चार शेळ्या ठार : मोटेगाव येथील घटना
नेरी
. नेरी येथून जवळ असलेल्या मोटेगाव येथे दि 20 ऑक्टोबर च्या पहाटेच्या तीन वाजता च्या सुमारास एका पट्टेदार वाघाने गावात घुसून शेळ्यांच्या गोट्यावर हमला करीत गोठयात घुसून बांधलेल्या चार शेळ्यावर हल्ला केला यात तीन शेळ्यांना जागेवरच ठार केले तर एका शेळीला उचलून पळवून नेले सदर घटनेची माहिती सकाळी कळली असता नागरिकांची बघण्यासाठी एकच गर्दी उसळली.
. मोटेगाव येथील ब्रम्हा पतरु कुंभरे यांच्या मालकीच्या चार शेळ्या एका पट्टेदार वाघाने ठार केल्या सविस्तर माहिती अशी की देवांनद खेडकर याचे गावातील जी प शाळेच्या मागच्या बाजूस घर असून लागूनच गोटा आहे सायंकाळी त्यांनी चारही शेळया गोठयात बांधल्या आणि निवांत झोपी गेले मात्र काळाने या गरीब माणसावर धावा चढवला वाघाच्या रूपात येऊन त्यांची संपत्ती लुटून नेली कारण तीन शेळ्या ह्या गरोदर असून लवकरच पिल्याना जन्म देणार होत्या त्यामुळे त्यांच्यावर अस्मानी संकट कोसळले व खूप मोठी नुकसान झाली सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली तात्काळ वनविभागाचे वनरक्षक पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून अहवाल वनविभागाला पाठविण्यात आले शेळ्यांच्या जाण्यामुळे कुंभरे यांच्या वर आर्थिक संकट निर्माण झाला असल्याने वनविभागाने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी तसेच गावाजवळील झुडपी जंगल साफ करून नियमित फिरणाऱ्या बिबट पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे


