Home विदर्भ शिवाजीराव मोघे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे माना जमातीचा मोर्चा

शिवाजीराव मोघे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे माना जमातीचा मोर्चा

829

 १० हजार नागरिकांचा लक्षणीय मोर्चा. 

सिंदेवाही 

.        आदिवासी मेळाव्यात शिवाजीराव मोघे यांनी गोंड आणि गोंडमाना ही वेगळी जमात असल्यामुळे आपण सत्तेत आल्यास माना समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून काढून टाकू असे वादग्रस्त विधान केल्यामुळे शिवाजीराव मोघे यांच्या विरोधात माना समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून सिंदेवाही, मुल, सावली, या तिन्ही तालुक्यातील माना समाजाच्या नागरिकांनी सिंदेवाही येथील कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. मोघेंच्या वादग्रस्त विधानावरून माना समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी निषेध नोंदवून मोर्चे काढीत आहेत. माना समाज विदर्भात मोठया संख्येने आहे.

.        माना ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे.केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीत माना समाज १८ व्या क्रमांकावर आहे. १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगाने माना समाजाला अनुसूचित जमातीचे सर्व हक्क व अधिकार बहाल केले होते. तेव्हापासून माना समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात मोडतो असा दावा माना समाजातील नेते करीत आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आदिवासी माना जमातीबद्धल केलेल्या अंसविधनिक वक्तव्याचा निषेध करीत सिंदेवाही येथील आठवडी बाजार मधून माना जमातीचा भव्यदिव्य मोर्चा काढून थेट तहसील कार्यालयावर धडकला. नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी मोर्चातील निवेदन स्वीकारले . यावेळी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे अध्यक्ष धीरज दांडेकर, सचिव हितेश चौधरी, अमोल नागोसे, पराग दांडेकर, महेश जांभुळे, स्वप्नील श्रीरामे, विलास सावसाकडे, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!