जय भीम च्या घोषणानी निनादले चंद्रपूर शहर
चंद्रपूर
. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांची निवड केली. हा जिल्हा वाघाचा म्हणून ओळखला जातो. पण बाबासाहेबांच्या रुपाने १९५६ मध्येच एक डरकाळी महाराष्ट्राने व साऱ्याने देशाने ऐकली. बाबासाहेबांनी संविधानातून हक्कांसोबत कर्तव्यही दिले. त्यामुळे केवळ स्मरण करून थांबू नये तर त्यांच्या विचारावर चालावे, असे आवाहन राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन मुख्य सोहळ्यात केले.
. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक दिनानिमित्त रविवारपासून सुरू झालेल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला सोमवारी जनसागर उसळला होता . असंख्य धम्म अनुयायांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला मानवंदना दिली. .सोमवारी सकाळी ११ वाजता ‘बुद्धधम्म व आधुनिक विज्ञान या विषयावर परिसंवाद झाला. दुपारी १:३० वाजता सामूहिक बुद्धवंदना व भदन्त नागार्जुन सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली धम्म प्रवचन झाले. यावेळी धम्मबोधी, धम्मविजय, कश्यप, महानामा, धम्मविकास व भिक्खू संघ उपस्थित होता. सायकाळी ५ वाजत झाला.
. यावेळी प्रमुख अतिथी भदन्त डॉ. वण्णासामी (अरुणाचल प्रदेश), भदन्त सारीपुत्त म्यानमार (ब्रह्मदेश), केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, डॉ. प्रदीप आगलावे, संस्थेचे अध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामन मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, अॅड. राहुल घोटेकर उपस्थित होते.

