Home पोलीस डायरी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक सिंदेवाही पोलिसांनी पकडला

कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक सिंदेवाही पोलिसांनी पकडला

796

 ट्रकमध्ये २७ बैलाचे पाय बांधून कोंबले होते 

 ट्रक चालक आणि साथीदार, पळून जाण्यात यशस्वी 

सिंदेवाही 

.           मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिंदेवाही येथील शिवाजी चौक ते देवयानी इंग्लिश शाळा पर्यंत सिंदेवाही पोलिसांनी पाठलाग करून अवैध जनावर वाहतूक करणारा टाटा कंपनीचा Ap २९ U ९२१९ या क्रमांकाचा ट्रक पकडला असून त्यामध्ये बैलांचे २७ नग कोंबून असल्याचे आढळून आल्याने ट्रकला जप्त करण्यात आले.

.           सिंदेवाही पोलिसांना जनावरांचा ट्रक येत असल्याची माहिती मिळताच शिवाजी चौकातून त्या ट्रकच्या पाठलाग करण्यात आला. आणि देवयानी इंग्लिश स्कूल जवळ त्याला पकडण्यात आले. मात्र तो पर्यंत ट्रक चालक आणि त्याचा साथीदार पळून गेला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये बैलांचे २७ नग अत्यंत क्रूर पणे पाय बांधून ट्रकमध्ये कोंबले होते. सदर बैल कत्तलीसाठी नेत असल्याचे समजले.

.           अंदाजे १० लाख रुपये किमतीचा ट्रक असून बैलांची किंमत २ लाख सत्तर हजार रुपये असे एकूण १२ लाख सत्तर हजार रुपये किमतीचा माल जप्त केला असून गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असून सदरची कारवाही ठाणेदार तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक सागर महल्ले, सहाय्यक फौजदार बावणे, सोनुले, गेडेकर, मोहित यांनी केली आहे

error: Content is protected !!