Home राजकीय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वरोऱ्यात सत्कार

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा वरोऱ्यात सत्कार

809

चंद्रपूर

.           चंद्रपूर जिल्ह्याच्या नुकत्याच दौऱ्यावर आलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वरोरा शहरात शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

.           चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे २ ऑक्टोबर ला व्हाईस ऑफ मीडिया च्या एक दिवशीय पत्रकारांची कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे १ ऑक्टोबर लाच मूल येथे दाखल झाले. 2 ऑक्टोंबर ला मुल येथील वाईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांच्या कार्यशाळेला ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवसभर उपस्थित होते. यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावात भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बुलढाणा येथे परतीच्या वाटेवर असताना वरोरा शहरातील रत्नमाला चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते किशोर डुकरे, सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!