शेतकऱ्यांमध्ये संताप
बल्लारपूर
. बल्लारपूर तालुक्यात युरियासोबत लिंकिंग केलेली खते घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याने शेतकऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. सोबतच किरकोळ कृषी दुकांदारांनाही सक्ती करण्यात येत असल्याने दुकांनदारही हैराण झाले आहेत.शेतकऱ्यांना लिंकिंग खताचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे सरकारच्या धोरणाचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
. शेतकऱ्यांना शेतीमालाचे उत्पादन घेत असताना युरिया खताची सर्वात जास्त आवश्यकता भासते.कृषी दुकानदाराकडे युरिया खताची खरेदीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना युरियाबरोबर कंपन्या इतर खते घेण्याची दुकानदार सक्ती करीत आहेत.ही खते घेतली तरच दुकानदारांना युरिया खत मिळेल,असे कंपनीकडून सांगितले जात असून त्याची सक्तीही करण्यात येत आहे.युरिया खताचे उत्पादन घेत असताना सरकार कंपन्यांना अनुदान देते. तरीही युरिया खताबरोबर इतर खते घेण्यासाठी कंपन्या दुकांदारावर दबाव आणत असल्याचा प्रकार दबक्या आवाजात पुढे येत आहे.युरिया खताबरोबर लिंकिंग केलेली खते खपविण्यासाठी दुकांदारासमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे.खत कंपण्याकडून थेट खते खरेदी करणारे ठोक व्यापारी लिंकिंगचे बळी पडत आहेत.किरकोळ दुकानदार ठोक व्यापाऱ्यांकडून खते खरेदीसाठी गेल्यास त्यांनाही युरियासह लिंकिंग खते खरेदी करण्याचा तगादा धरत असल्याने इतर खते विकण्याचा गंभीर प्रश्न किरकोळ दुकांदारासमोर उभा ठाकल्याने खते घेण्यास नकार देत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
. शेतकरी शेतीमालाचे उत्पादन घेतांना अनेक प्रकारची खते वापरून जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतो.सोबत कंपनीने देखील अतिरिक्त खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नये.शेतकऱ्यांनी युरिया खतासोबत लिंकिंग केलेली इतर खते घेतली तर शेतमालाचा उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.आधीच अतिवृष्टीने तसेच पुरात व विविध रोगाने शेतपिक उध्वस्त होत असताना पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सोयाबीन,धान, कापूस आदी पिकांना सध्या युरिया खताची नितानंत गरज असतांना युरियासोबत इतर लिंकिंग खते घेण्याची सक्ती केल्या जात असल्याने शेतकरी जाम कंटाळला असून तीव्र शब्दात नाराजी नोंदवीत आहे.कंपन्यांकडून लिंकिंग केलेली खते घेण्यासाठी सक्ती केली जात असल्यामुळे ठोक व किरकोळ दुकांनदारामध्ये देखील नाराजीचा सूर उमटत आहे

