Home राजकीय अतुल भैसारे यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांचा पुण्यात आम आदमी पार्टीत जाहीर पक्ष...

अतुल भैसारे यांच्या सोबत अनेक कार्यकर्त्यांचा पुण्यात आम आदमी पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश

810

दिल्लीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती

भद्रावती

.          दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचाराने प्रेरित होऊन व दिल्लीत होणारे शिक्षा, स्वास्थ, बिजली, पाणी यावर काम बघून आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व पूर्व बीएसपी नेते अतुल भैसारे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसोबत राज्य संघटन सचिव भूषण ढाकुलकर व चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष मयुर राईकवार यांच्या प्रमुख उपस्थित खासदार संजय सिंग यांच्या हस्ते पुणे येथे जाहीर पक्षप्रवेश केला.

.          आम आदमी पार्टी महाराष्ट्र तर्फे भव्य महासंकल्प सभा पुणे इथे घेण्यात आले. यावेळी दिल्लीचे राज्यसभा खासदार संसदेची बुलंद तोफ संजय सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रा चे प्रभारी गोपाल इटालिया यांचा मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आले. हजारों च्या संख्येने कार्यक्रमात कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बाबासाहेबांच्या संविधानावर आज कोणी इमानदारी ने काम करुन दाखवत असेल तर ते फक़्त दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच करुन दाखवत आहे म्हणून मी पक्ष प्रवेश करत आहो असे अतुल भैसारे यांनी सांगितले. त्यांच्या अचानक आम आदमी पार्टी मधील पक्ष प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

error: Content is protected !!