- विविध सामजिक कार्याचे आयोजन
वरोरा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ सकाळी ११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा ,वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
यामध्ये प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद आपले मास्तर प्रा.नितेश कराळे वर्धा यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इयत्ता १०व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ,सीटीव्ही वरोरा लोकल चॅनेलचे भव्य उदघाटन आणि उन्माद विषमतेचा या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे सदर कार्यक्रमाचे उदघाटन आयुष नोपानी (भापोसे) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष, राजेश सोलापण महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर हे राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे ,चंद्रपूर ज्येष्ठ अधिवक्ता ॲड .पुरुषोत्तम सातपुते चंद्रपूर ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुथा माढेळी , कार्यकारी अध्यक्ष धनराज आस्वले, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर सुषमाताई शिंदे स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल टेबल ट्रस्ट चंद्रपूर ,ज्येष्ठ कवयित्री शोभाताई वेले नागपूर , विश्वस्त ,सुधाकर कडू महारोगी सेवा समिती आनंदवन, वरोरा यांची उपस्थिती राहणार आहे सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अशफाक शेख,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा, सचिव सुनिल शिरसाट, सचिव संजय तोगट्टीवार स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, संघटक हितेश राजनहिरे , महाराष्ट्र राज्य ग्रामीण मतदार संघ वरोरा ,अमर गोंडाने,सदस्य, मुजाहिद कुरेशी ,फैज पटेल, विश्वदीप गोंडाने ,अजीम शेख, अहेफाज शेख यांनी केले आहे


