Home सामाजिक आमदार मुनगंटीवारांनी कर्मचाऱ्यांना दिली शाबासकी

आमदार मुनगंटीवारांनी कर्मचाऱ्यांना दिली शाबासकी

1221

खासगी बसने अचानक घेतला पेट

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

बल्लारपूर : चंद्रपूर – बल्लारपूर मार्गांवर विसापूर जवळ टोल नाका आहे. या टोल नाक्यावरून एक खासगी प्रवाशी बस जात होती. ही घटना १0 डिसेंबर रोजी ची आहे. त्यावेळी त्या खासगी बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. बस मधील ४0 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल माजी वन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्या कर्मचाऱ्यांना शाबासकी दिली. त्यांचा बुधवारी टोल नाक्यावर थांबून सत्कार केला.

.   बल्लारपूर – चंद्रपूर मार्ग नेहमी वर्दळीचा आहे. या मार्गांवर नेहमी अपघाताच्या घटना घडतात. असाच एक प्रसंग १0 डिसेंबर रोजी घडला. एक प्रवाशी खासगी बस ४0 प्रवाशांना घेऊन चंद्रपूर येथून बल्लारपूर कडे जात होती. ही वेळ सकाळी ११ वाजताची होती. विसापूर टोल नाका जवळ येताच बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार टोल नाक्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान राखले. बस थांबवली. त्यातील ४0 प्रवाशांना बस खाली उतरवले.अग्नीशमन यंत्रणेच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली. विसापूर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.

.     हा प्रसंग आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात होता. ते बुधवारी या मार्गांने जात होते. ते टोल नाक्यावर थांबून त्या घटनेची माहिती घेतली. टोल नाका व्यवस्थापक दिपक कंचर्लावार, कर्मचारी रंजना भिसे, सचिन नागापूरे, रोशन पेटकर, सुमित ढेंगळे, प्राजक्ता भसारकर, प्रकाश गजपुरे, विद्या गेडाम, अभिषेक आत्राम आदींचे कौतुक करून शाबासकी दिली. त्यांचा पुष्पगुच्छ प्रदान करून आमदार मुनगंटीवार यानी सत्कार केला.

error: Content is protected !!