भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालयात भव्य आयोजन
भद्रावती : शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विदर्भातील विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेअंतर्गत येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा आज दि 28 डिसेंबर ला आयोजित करण्यात आला आहे.
. आज दिनांक 28 डिसेंबर रोज शनिवारी होणाऱ्या या स्नेहमिलन सोहळ्याचा उद्देश या संस्थेअंतर्गत येणाऱ्या विविध शाळा महाविद्यालयात अनेक वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची परस्परात ओळख निर्माण होऊन स्नेह वृद्धिगत व्हावा. परस्परांच्या कार्याचा परिचय व्हावा. कर्मचाऱ्यांमध्ये ऋणानुबंध वृध्दिंगत व्हावे. त्यातून संस्थेच्या कार्याला बळकटी येऊन संस्थेची भरभराट व्हावी या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून सचिव अमन टेमुर्डे, उपाध्यक्ष जयंत टेमुर्डे, सहसचिव राजू गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले, सदस्य सर्वश्री झेड. बी. लांबट, शैलेश महाजन, विजय गावंडे, माया राजूरकर, ईजाज अशरफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
. या सोहळ्यात विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा, विवेकानंद पूर्व प्राथमिक शाळा वरोरा, विवेकानंद उच्च प्राथमिक शाळा वरोरा, अरविंद विद्यानिकेतन हायस्कूल वरोरा, विवेकानंद माध्यमिक विद्यालय मांगली, विवेकानंद माध्यमिक विद्यालय साठगांव, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती, विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती, विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथील कार्यरत कर्मचारीवृंद सहभागी होतील. आज सकाळी १० वाजता विवेकानंद महाविद्यालयातील श्री अरविंद सभागृहात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास विवेकानंद ज्ञानपीठातील सर्व कर्मचारीवृंदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.


