Home सामाजिक व्हॉइस ऑफ मीडिया भद्रावती तालुकाध्यक्ष पदी राजेश रेवते यांची बिनविरोध निवड

व्हॉइस ऑफ मीडिया भद्रावती तालुकाध्यक्ष पदी राजेश रेवते यांची बिनविरोध निवड

1230

माजरी : देशातील पत्रकारांच्या सर्वात मोठी संघटना म्हणून उदयास आलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांची जिल्हाध्यक्ष, डिजिटल मीडिया विंग, साप्ताहिक विंग आणि तालुकाध्यक्ष पदाकारिता बुधवारी दि.२५ डिसेंबर रोजी चंद्रपूर येथील सीडीसीसी बँकेच्या कन्नमवार सभागृहात आयोजित आमसभेत लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडली.

.     सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष पदासाठी मतदान करण्यात आले. त्यानंतर डिजिटल मीडिया, साप्ताहिक विंग आणि सर्व तालुकांच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. दरम्यान भद्रावती तालुकाध्यक्ष पदासाठी राजेश रेवते आणि शेख जावेद शेख बब्बू यांची नावे नामांकित करण्यात आली होती. मात्र, शेख जावेद शेख बब्बू यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने राजेश रेवते यांची बिनविरोध निवड झाली. निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजू जोगड, आशिष रैच, श्रीहरी सातपुते यांनी विशेष मेहनत घेतली.

.     यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, राज्य उपाध्यक्ष संजय पडोळे, विदर्भ अध्यक्ष किशोर करंजेकर आणि वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!