सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव समारंभ
बल्लारपूर : आजघडीला आपण दोन गोष्टीवर खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाही. ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य आहे. मात्र, या दोन्ही गोष्टी अतिशय महाग झाल्या आहे. शिक्षण क्षेत्र र्वताचे आहे. र्वतानुसार शिक्षण संस्था चालविल्या पाहिजे.त्यासाठी नेटाने प्रयत्न झाला पाहिजे. यामधून सर्वांना शिक्षण मिळणे क्रमप्राप्त आहे. शिक्षण घेऊन माणसाने माणूस होण्याचा उद्देशाने कार्यप्रवण होण्याचा प्रयत्न करावा, असा हितोपदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी बुधवारी सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या वार्षिकोत्सव समारंभात दिला.
. चंद्रपूर सन्मित्र मंडळ द्वारा संचालित बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर होते.यावेळी सन्मित्र मंडळाचे सचिव ॲड.निलेश चोरे,कमांडर सुरिंदकुमार राणा,प्राचार्य अरुंधती कावडकर यांची उपस्थिती होती.
. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानव आणि प्राणी यांच्यातील भेद आहे. प्राण्यांना मन नाही. भूक शमविण्यासाठी तो वैरण खातो. भूक शमल्यानंतर वैरण प्राणी तसेच सोडतो. मात्र, माणसाचे तसे नाही. त्यांच्यात विचार करण्याची क्षमता आहे. तो इतरांच्या भुकेचा विचार करतो.जो स्वतःसाठी जीवन जगतो. त्याचे नाव कोणी घेत नाही. ‘नर करणी करे, तो नारायण बन जाये’ .स्वामी विवेकानंद सारखे जीवन जगणाऱ्यांचे जीवन सार्थक आहे. प्रभू रामचंद्राचा आदर्श समोर आहे, असेही ते म्हणाले.
. सरसंघचालक डॉ. भागवत पुढे म्हणाले, माणसांची बुद्धी निट चालली,तर नराचा नारायण होतो.अन्यथा त्याच्या नशिबात नराधम होण्याची वेळ येते. संवेदनशील माणुसच विद्वतेचा उपयोग दुसऱ्यांसाठी करू शकतो. विद्येच्या बळावर सन्मित्र होतो.सन्मित्र होण्यासाठी दृढ निश्चयाने वाटचाल करावी लागते.सर्वोत्तम शिक्षणातून उकृष्टतता घडली पाहिजे. त्याच ठिकाणी परमेश्वर आहे. आपले सैनिक संकल्पवृत्तीने मृत्यूला सामोरे जातात. देशाच्या सिमाचे संरक्षण करतात. त्यांच्यात शिस्त,संयम,दृढ निश्चय व सामुहिक प्रयत्न असतो.तोच प्रयत्न सन्मित्र सैनिकी शाळेत केला जात आहे. याचा सार्थ अभिमान आहे. प्रयत्न केला, तर वाळूच्या कणांतून तेल काढण्याची क्षमता आपल्यात असावी.माणूस तयार करणे,हे शिक्षणाचे ध्येय असावे, असाही सल्ला त्यांनी आपल्या तीस मिनिटाच्या भाषणातून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्मित्र मंडळाचे सचिव ॲड.निलेश चोरे यांनी केले. संचालन व आभार प्राचार्य अरुंधती कावडकर यांनी मानले. यावेळी सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या पालकांची, लोकप्रतिनिधींची,मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
सन्मित्र मंडळाच्या वतीने सरसंघचालक डॉ. भागवत यांचा सत्कार सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव समारंभात प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा सन्मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह प्रदान करून आदरसत्कार करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रम स्थळी प्रमुख अतिथी येताच सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली. चित्तथरारक विविध प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस कंपनीचे उत्कृष्ट नायक अनुराग रामटेके यांचा सत्कार करण्यात आला.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘स्वतंत्र ते भगवती’ हे गीत सादर करून विद्यार्थ्यांनी वाहवा प्राप्त केली. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


