Home सामाजिक आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग असणे गरजेचे – चंद्रहास सुटे

आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग असणे गरजेचे – चंद्रहास सुटे

1238

वरोरा येथे पेन्शनर्स डे उत्सहात साजरा

वरोरा : पेन्शनर्स च्या कोणत्याही आंदोलनात विशेषतः जुनी पेन्शन मिळण्याकरीता होत असलेल्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, नागरीक म्हणून बेरोजगार युवक, शेतकरी असंघटीत कामगार यांचे आंदोलन तसेच आपल्या संबंधित मागण्या साठीच्या वेळोवेळी होत असलेल्या आंदोलनात आपला प्रत्यक्ष सहभाग असणे गरजेचे आहे. भांडवलदार आणि कार्पोरेट घराण्यांना पोषक केंद्रसरकारच्या नितीच्या विरूष्ट आंदोलनाची गरज असल्याचे चंद्रहास सुटे यांनी वरोरा येथे पेन्शनर्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमात मनोगतातुन व्यक्त केले.

.    वरोरा तालुका पेन्शनर्स बहुद्देशीय असोशिएशन वरोरा च्या वतीने स्व. दादासाहेव देवतळे स्मृती शेतकरी भवन को-ऑपरेटीव्ह बँक परीसर वरोरा येथे पेन्शनर्स डे चे आयोजन करण्यात आले होते.

.     यावेळी अतिथी व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मंचावर प्रमुख अतिथी राष्ट्रीय सरकारी सेवानिवृत्त संघटना सचिव चंद्रहास सुटे नागपूर, राज्य सरकारी सेवानिवृत्त संघटना सहकोषाध्यक्ष प्रकाश काळबांडे नागपूर, माजी नगरसेवक न.प. वरोरा शेख जैरूद्‌दीन (छोटुभाई), लोकशिक्षण संस्था वरोरा चे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, सिनेआर्क प्राडक्शन्स पुर्ण आणि रूद्रांश फाउंडेशन मुबई तर्फे महाराष्ट रत्न पुरस्कार प्राप्त भाऊराव चिवंडे, माजी उपाध्यक्ष अशोककुमार पाठक, आश्रयनाता रमेशचंद्र चावडा, अध्यक्ष आवाजी देवाळकर, उपाध्यक्ष तुळशिराम विरूटकर आणि महाराष्ट न्यूज चे प्रतिनिधी हितेश राजनहिरे उपस्थित होते.

.    यावेळी हितेश राजनहिरे यांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. वयाची ७५, ८०, ९०, ९५ वर्ष पुर्ण करणाऱ्या आजीव सभासद महिला १० पुरुष २७ अशा ३७ वयोवृध्द आजीव सभासदांचा सत्कार करण्यात आला. अतिजेष्ठ महिला २ आणि पुरुष ८ आजिव सभासदांचा त्याच्या घरी जाउन सत्कार करण्यात आला सत्कार मुर्ती तर्फे भाउराव चिवंडे आणि शरद मेंडूलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. श्रीकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जेष्ठ पेन्शनर्सना बँकेत पेन्शनसाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये त्यांचे घरी पेन्शन मिळण्याची सुविधा असावी असे मत मांडले, संघटना करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. शेख जैरूद्‌दीन (छोटुभाई), यांनी सहा महिण्यात मी तुमच्या वाचनालयाची वास्तु कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला सोपवितो या पुढील कार्यक्रम तुम्ही तुमच्या हक्कांच्या वास्तुच्या प्रांगणात राहाल अशी ग्वाही दिली निवडणुक आचार संहिता व इंजीनिअरच्या बदली मुळे विलंब झाला असे सांगितले प्रमुख अतिथी  प्रकाश काळपांडे यांनी पेन्शनर्स यांच्या कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सहकार्य करेन. आपण मला सांगा असे सांगितले.

.       कार्यक्रमाला २४९ आजीव सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव देवराव कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन नामदेव काळे यांनी केले. प्रास्ताविक कोषाध्यक्ष देवराव पारखी पेन्शनर्स डे चा अहवाल सदस्य राजेश कावलकर यांनी सादर केला

.     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष विरूटकर, सचिव कांबळे, सहसचिव दत्तत्रय आस्वले, कोषध्यश्व दे.पा. पारखी, सदस्य ग.पा. कावलकर, दिनकर राउत, नामदेव काळे, वसंतराव मानुसमारे, सिताराम पाल, सुरेश वरवटकर, सिंधुताई उत्तरवार, शशीकला पोईनकर, दुर्गा ठाकरे आणि मि. रा. वानखेडे यांनी परीश्रम घेतले.

error: Content is protected !!