कुचना : समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावती (मावीम) अंतर्गत “स्त्री पुरुष संयुक्त मालकी हक्क” विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले होते.
. महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय चंद्रपूर अंतर्गत समन्वय लोकसंचालीत साधन केंद्र भद्रावती नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत कृतीसंगम महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी भद्रावती समन्वय लोक संचालित साधन केंद्र, भद्रावती येथे सर्व सीआरपी, माविम मित्र मंडळ प्रतिनिधी, FPC संचालक मंडळ यांचे करिता “स्त्री पुरुष संयुक्त मालकी हक्क” या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
. या प्रशिक्षण कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून तलाठी अधिकारी अनिल शृंगारे, रुपेश शेंडे, सहा जिल्हा समन्व्यक अधिकारी, माविम, भूषण मुंजेकर डीपीसी चंद्रपूर व केंद्राच्या च्या अध्यक्षा आशा प्रफुल ताजने, व्यवस्थापक दक्षिणा बि.हुमने केंद्राचा सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणामध्ये लिंगभेद, पितृसत्ताक पद्धतीचा उगम कसा झाला व हिंदू वारसा हक्क, संयुक्त वारसा हक्क, स्वतंत्र वारसा हक्क, लक्ष्मी मुक्ती योजना संबधीचा कायदा तसेच जमीन हस्तांतरणाच्या प्रकीर्या यासंदेर्भात मार्गदर्शन करून कायद्याची सविस्तर माहिती उदाहरणासह अनिल शृंगारे तलाठी तसेच रुपेश शेंडे, सहा जिल्हा समन्व्यक अधिकारी यांनी समजावून सांगितले.
. केंद्राच्या अध्यक्षा म्हणून आशा प्रफुल ताजने यांनी आपल्या मनोगतातून सर्व प्रशिक्षणार्थींना गावात जाऊन “स्त्री पुरुष संयुक्त मालकी हक्क बाबत वातावरण निर्मिती करून कामाला सुरवात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन शालिनी दुर्योधन यांनी केले. सदर कार्यक्रमा करिता केंद्राचे लेखापाल रजनी रामटेके, उपजीविका सल्लागार सपना कचाटे क्षेत्रीय समन्वयक शालिनी रायपुरे यांनी कार्यक्रम यशस्विते करिता सहकार्य केले.


