शेकडो नागरिकांनी केली मोफत तपासणी
वरोरा : हेल्पएज इंडिया जीएमआर वरोरा व अभिजित कुडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वाघनख येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
. आपल्याला समाजाला काहीतरी द्यावे लागते या भावनेतून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहे असल्याचे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी यावेळी केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते. अश्या प्रकाराचे शिबीर नेहमी आयोजित करणार असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे असे प्रतिपादन अभिजित कुडे यांनी केले.
. या शिबिरात जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ताप, सर्दी, खोकला, बिपी, शुगर, अस्थमा या आजाराचे निदान तसेच मोफत औषधोपचार करण्यात आला. यावेळी सीनियर एक्झिक्युटीव्ह रशेदा शेख, डॉ. संदीप काळे, संदीप नरवडे, वैभव देठे यांची वैद्यकीय टीम उपस्थित होती. या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभम चिमुरकर, रूपेश शेंडे, अशोक पिसे व गावातील युवकांनी सहकार्य केले.


