Home सामाजिक गवराळा येथे जगन्नाथ महाराजांची मूर्ती तथा शिवलिंग स्थापना

गवराळा येथे जगन्नाथ महाराजांची मूर्ती तथा शिवलिंग स्थापना

1264

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

भद्रावती : जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळातर्फे स्थानिक गवराळा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या जगन्नाथ मंदिरात जगन्नाथ महाराजांची मूर्ती तथा शिवलिंग स्थापनेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

.     दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात भाके महाराज व मंडळाच्या सर्व सदस्यांच्या ऊपस्थितीत जगन्नाथ महाराजांच्या मुर्तीची तथा शिवलींगाची स्थापणा करण्यात आली.त्यानंतर हभप सुवर्णाताई पिंपळकर यांच्या प्रबोधनात्मक किर्तनाचे आयोजन करण्यात आले.सायंकाळी ५वाजता गवराळा प्रभागातील प्रमुख रस्त्यांवरुन ढोल, ताशे तथा डिजेच्या निनादात श्री जगन्नाथ महाराजांच्या दमणी पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यात भजन मंडळांसह परीसरातील नागरीक सहभागी झाले होते. दिनांक १६ला गोपालकाला किर्तन तथा महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

.     मंदिरासाठी श्री जगन्नाथ महाराजांची मुर्ती दान देणाऱ्या डोंगे, माणुसमारे व चामाटे परीवारांचा सत्कार करुन त्यांचे मंडळातर्फे आभार मानण्यात आले. सदर सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी तथा तरुणांच्या यंग ब्रिगेडने उल्लेखनीय सहकार्य केले. सोहळ्यात परीसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!