राज्यातील कानाकोपऱ्यातून मित्रांची उपस्थिती
दिवंगत शिक्षक व मित्रांना श्रद्धांजली
कोरपणा : वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपणा येथील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 25 वर्षानंतर एकत्र येत वसंतराव नाईक विद्यालय येथे स्नेह मिलन सोहळा साजरा केला या निमित्त शालेय, कॉलेज जीवनाच्या गोड आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
. वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या वर्ग मित्रांना एकत्रित करीत जुन्या आठवणीना उजाळा देत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नागपूर, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ,आदीलाबाद आदी ठिकाणांहून काही जण एक ते दोन दिवसांचा प्रवास करून कार्यकम स्थळी पोहोचले. कार्यक्रमाच्या ठिकाणी जुन्या आठवणीला उजाळा देणारे असल्याने शालेय जीवनातील रमणीयता वातावरणाला अधिक प्रसन्न बनवत होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत शिक्षक व मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अनोख्या भेटीमध्ये ‘काय केले २५वर्षांत ? यावर सखोल चर्चा झाली. शिक्षण, सामाजिक काम, पुढील अभ्यास, घरकुल, कुटुंब आणि जीवनातील इतर अनेक पैलू यावर सर्वांनी छान गप्पा मारल्या. शालेय जीवनातील विविध अनुभव, क्रीडा स्पर्धा, शारदोत्सव, सूक्ष्म पाठ आणि कॉलेजमधील आठवणी उजळण्यात आल्या.
. विशेषतः आयोजनाचे उत्तम काम केल्याबद्दल भाग्यश्री रणदिवे, किरण गुर्जर, हाफिज शेख, प्रवीण कारेकर, महेश हजारे, राजेश ठाकरे, रिजवान शेख, सतीश मिटकर, विनय मेश्राम, विनायक ठाकरे, दीपक माहुरे, जितू निरंजने यांनी सर्वांबरोबर समन्वय साधून उत्तम काम केल्याबदल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


