चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम साजरी करण्यात आली.
. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली, या दरम्यान रुग्णालयातील अनेक त्रुटी आढळून आल्या. रुग्णांसोबत येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था नाही, रुग्णांना वेळेवर रक्तही मिळत नाही, अशा अनेक प्रश्नांवर राहुल देवतळे यांनी निवेदन दिले. या सर्व सुविधा न दिल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे संकेतही दिले.
. या कार्यक्रमात शहराध्यक्ष दीपक जयस्वाल, शहर सरचिटणीस सुहास पिंगे, राजेंद्र आखरे, मारोती झाडे, विनोद लभाणे, ऍड. निमेश मानकर, बब्बू ईसा, ठाकुर, मनोज बंडेवार, अशोक घुमडे, अभय राऊत, परब गिरडकर व पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


