वरोर्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
वरोरा : परभणी येथे डॉ. बाबासाहेब अबिडकरांच्या पुतळ्यासोबत असलेल्या संविधान शिल्पाची दि. १० डिसेंबर २०२४ रोजी नासधूस करुन त्याची विटंबना जातीयवादी शक्तीकडून करण्यात आली या भ्याड कृत्याचा वरोर्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून निषेध करीत पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू पावलेल्या सूर्यवंशी यांच्या मृत्युची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या एका निवेदनातुन करण्यात आली.
. या निवेदनात म्हटले आहे की, संविधान शिल्पाची विटंबनाच्या निषेधार्थ जे आंदोलक रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत व तेथील अटक सत्र त्वरीत थांबवावे. या प्रकरणातील जो आरोपी सापडलेला आहे तो बागायती शेतकरी व सुशिक्षीत आहे. तरीसुध्दा त्याच्या पाठीमागील शक्तीला लपविण्यासाठी पोलीस खात्याने त्या आरोपीला माथेफिरु, मनोरुग्ण संबोधून सर्व तपास गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर पोलीसांच्या अमानूष मारहाणीत मृत्यू पावलेल्या शहीद सोमनाय सूर्यवंशी यांच्या मृत्युची न्यायालयीन चौकशी करा तसेच सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी. तसेच पॅथर विजय वाकोडे यांच्याही मृत्यूची चौकशी झालीच पाहीजे. या प्रमुख मागण्यासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
. निवेदन देताना विनोद वानखेडे, सुनील गायकवाड, बंडू लभाने, रमेश ठाकरे, दर्शन वाघमारे, निलेश सरकटे, विजय तेलंग, गौरव भोगेकर, सुनील कामडे, अश्विनी तामगाडगे, अनिल वानखेडे, गणेश बडवाईक, आनंद ढोके, प्रभूदास भगत, भीमराव पाटील, अशोक गोटे, भाऊराव घुटके आदींची उपस्थिती होती.


