Home सामाजिक रामपुर, नांदा, भंगाराम, तळोधी, धाबा येथे होणार सुसज्ज वाचनालय

रामपुर, नांदा, भंगाराम, तळोधी, धाबा येथे होणार सुसज्ज वाचनालय

1292

वाचनालय बांधकामासाठी ६०० लक्ष मंजूर

आ. देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश

राजुरा : राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांच्या विनंतीनुसार राजुरा विधानसभा क्षेत्रातील रामपुर, नांदा, भंगारम तळोधी, धाबा येथे सुसज्ज वाचनालय इमारतीच्या बांधकामासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जिल्हा खनिज निधीअंर्गत प्रत्येकी सुमारे १५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

.     राजुरा विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज अशा वाचनालयाच्या निर्माणासाठी आमदार देवराव भोंगळे हे प्रयत्नशिल होते, त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले

.     या वाचनालयाच्या बांधकामाकरीता भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार तसेच राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचे राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेने आभार मानले.

error: Content is protected !!