Home सामाजिक 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून दिले सामाजिक बांधिलकीचे दर्शन

45 रक्तदात्यांनी रक्तदान करून दिले सामाजिक बांधिलकीचे दर्शन

1293

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

वरोरा : शेषरत्न बहुउद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात एकूण 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

.     या शिबिराचे उद्घाटन रोटेरिअन रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष बंडू देऊळकर, शेषरत्न बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष धिरज लाकडे, रोटेरिअन विजय पावडे, मंगला डांगरे (सदस्य, शेषरत्न बहुउद्देशीय संस्था), पंकज पवार (अधिक्षक, सरकारी रक्तपेढी चंद्रपूर) आणि डॉ. स्वाती देरकर (उपजिल्हा रुग्णालय, वरोरा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व आणि या उपक्रमाच्या गरजेवर प्रकाश टाकला.

.      शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रकाश चंगडिया (अध्यक्ष, माहेश्वरी समाज वरोरा) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. प्रफुल्ल खुजे (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय वरोरा), रत्नमाला लाकडे (सहसचिव, शेषरत्न बहुउद्देशीय संस्था), सतिश डांगरे, कीर्ती कातोरे, प्रतिभा ढगे, किरण ढेंबरे, आदर्श आस्कर, अभिजित मणियार (सचिव, रोटरी क्लब वरोरा), राम लोया, अमित लाहोटी, अमित नाहार, सचिन जिवतोडे यांच्यासह शेषरत्न बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि रोटरी क्लब वरोरा यांचे विशेष योगदान लाभले. रक्तदान हे जीवनदान असल्याचे अधोरेखित करून शिबिराद्वारे युवक-युवतींना आणि समाजातील विविध घटकांना रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूक करण्यात आले. या शिबिराद्वारे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये साठवणूक वाढवण्याचा उद्देश होता.

.      शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रोटेरिअन बंडू देऊळकर यांनी, “रक्तदान ही मानवतेची सेवा असून त्याद्वारे जीवन वाचवण्याचा सर्वोच्च आनंद मिळतो,” असे मत व्यक्त केले. धिरज लाकडे यांनी संस्थेच्या वतीने नियमितपणे असे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. या शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, तसेच रक्तदाते यांची उपस्थिती लाभली. रक्तदानातून समाजातील गरजू रुग्णांना नवी उमेद मिळेल, अशा शब्दांत सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल अजूनही काही समाजघटकांमध्ये गैरसमज आहेत. या शिबिराने या गैरसमजांना दूर करत रक्तदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला आहे. आयोजक संस्थांनी पुढील काळात अशा उपक्रमांची मालिका राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

error: Content is protected !!