Home सामाजिक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी पुलाखाली 2 ठार 1 गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी पुलाखाली 2 ठार 1 गंभीर

1286

बाबुपेठ उड्डाणं पुलावरील घटना

चंद्रपूर : नव्याने वाहतुकीसाठी खुला झालेला बाबूपेठ उड्डाण पुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकी थेट पुलावरुन खाली कोसळली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. आर्यन विठ्ठल मेश्राम (१७,) रा. माजरी, ता. भद्रावती आणि रवी ऊर्फ साहिल संजय ढवस ( २१) असे मृतकांची नाव आहेत. सुयोग सुरेश डांगे (चिमूर) हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

.      प्राप्त माहितीनुसार, आर्यन, साहिल, सुयोग हे तिघे मित्र दुचाकीने शहराचा दिशेने निघाले होते. नव्याने निर्मिती झालेल्या बाबूपेठ पुलावरून शहराच्या दिशेने येत असताना त्याच दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली. या धडकेने तिन्ही मित्र दुचाकीवरून थेट पुलावरुव खाली कोसलळे. या घटनेत दुचाकीचालक आर्यन मेश्राम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रवी ऊर्फ साहिल संजय ढवस याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात तिसरा मित्र सुयोग सुरेश डांगे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

.    घटनेनंतर धडक दिलेल्या वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या नवीन पुलावरचा हा पहिलाच अपघात आहे. या पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!