Home सामाजिक वासेरा येथे “भिमज्योत” द्वारे बाबासाहेबांना अभिवादन

वासेरा येथे “भिमज्योत” द्वारे बाबासाहेबांना अभिवादन

1290

सिंदेवाही : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील, तळागाळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी अथक प्रश्रम घेत भारतीयांना संविधान बहाल केले. आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगता यावं, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी ऐतिहासिक समारंभात बौद्ध धम्म स्वीकारला. आणि आपल्या असंख्य अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. व काही महिन्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेला ६७ वर्ष पूर्ण झाले असून नुकताच बौद्ध समाज नगर कमेटीचे वतीने भीमज्योत रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

.      सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन करून, नाशिक येथील काळाराम मंदिरमध्ये दलीत समाजाला प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला, तर दीन दलितांना पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळावा म्हणून चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत असून त्यांची शिकवण ही पुढील पिढीसाठी आदर्शवत ठरणार असल्याचे मान्यवर उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. सायंकाळी पाच वाजता गावातील प्रमुख मार्गाने “कँडल मार्च ” काढून बाबासाहेब “अमर रहेच्या” घोषणा देण्यात आल्या. श्रवस्ती बुद्धविहार परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

.     विचारमंचावर अध्यक्ष म्हणून ग्राम पंचायत सरपंच दिलीप मेश्राम, प्रमुख अतिथी उपसरपंच महेश बोरकर, पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, नगर कमेटी अध्यक्ष सुभाष रामटेके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कापकर, माजी अध्यक्ष राजू नंदनवार, नगर कमेटी माजी सचिव महेंद्र कोवले, रमाबाई महिला मंडळ अध्यक्षा अस्मिता रामटेके, सचिव रजनी कोवले, ग्राम सदस्य नागेश बंडीवार, मंदा मुनघाटे, इत्यादी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रणय कोवले, तर कोषाध्यक्ष रितेश सूर्यवंशी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. बुद्ध वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!