Home सामाजिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १२९ रूग्णांना मिळणार दृष्टी

मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात १२९ रूग्णांना मिळणार दृष्टी

1288

श्री तिरूपती बालाजी देवस्थानचा उपक्रम

राजुरा : चुनाळा येथील श्री तिरूपती बालाजी देवस्थानाच्या एकोणिसाव्या ब्रम्होत्सव सोहळयाअंतर्गत परिसरातील अंध रूग्णांना दृष्टी लाभावी याकरीता दरवर्षीप्रमाणे मेडीकल कॉलेज सेवाग्राम च्या सहकार्याने आयोजित मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात २७२ रूग्णांची तपासणी करण्यात आली त्यातील १२९ रूग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेस पात्र ठरले असून या सर्वांना देवस्थानाच्या या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दृष्टी मिळणार आहे.

.     मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या उद्घाटन सोहळया प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ए. सि. बी. कंपनीचे व्यवस्थापक राजबिरसिंग तवर, उदघाटक राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ अशोक जाधव, मुख्य अतिथी देवस्थांचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, नेत्र तज्ञ डॉ प्रीतम भैसारे, डॉ मनोज शेंडे, डॉ लांजेवार, वेकोलीचे एरीया प्लॅनींग आफीसर श्रीपुरम चक्रवर्ती, देवस्थानचे सचिव वाय राधाकृष्ण, बल्लारपूर चे मेंदू तज्ञ डॉ प्रशिक वाघमारे, देवस्थानचे संचालक सह मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.

.     सदर शिबीरात परिसरातील रूग्णांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. त्यात जवळपास २७२ रूग्णांनी तपासणी करून १२९ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. या सर्व रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या तारखांत सेवाग्राम येथे नेऊन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबीरात रूग्णांची तपासणी मेडीकल कॉलेज सेवाग्राम चे नेत्रचिकित्सक डॉ. अजाबराब धाबर्डे, डॉ अजहर शेख, डॉ प्रांजल‌ जैन, डॉ मयुर आईलवार, समाजसेवक सचिन ताकसांडे, सुशिल वाणी यांनी केली असून माणिक पिंगे, सुरेश सारडा, अशोक शाह, शंकरराव पेद्दुरवार, सुरेंद्र निमकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदिप बोबडे यांनी मानले .

error: Content is protected !!