Home सामाजिक मालेवाडा येथे आदिवासी महिला संघटन मेळावा संपन्न

मालेवाडा येथे आदिवासी महिला संघटन मेळावा संपन्न

1293

नेरी : चिमुर तालुक्यातील मलेवाडा येथे दि 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबरला दोन दिवसीय आदिवासी महिला संघटन मेळावा मोठादेव देवस्थान येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात वीर भगवान बिरसा मुंडा यांची 149 वी जयंती तसेच वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचा 166 वा स्मृतीदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्यात आदिवासी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येऊन त्यांच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक प्रश्नवर सुद्धा मंथन करण्यात आले.

.        यावेळी विविध भजन मंडळांनी भजने सादर केली 1 डिसेंबर ला सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात अनेक महिला पुरुषांनी पारंपरिक वस्त्रे परिधान करून सहभाग घेतला होता. यानंतर 12 वाजता सल्ला गागरा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प स सदस्य राजू कापसे तर अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रावण बाबूराव कुमरे मलेवाडा उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्याल चिमूर खांगार आठवले, सुरेश चौधरी, धनराज मुरकुटे, आदिवासी युवा एकता समिती गडचिरोली उपाध्यक्ष सुधीर मेश्राम, टायगर सेना गडचिरोली अध्यक्ष प्रियदर्शन मडावी मान्यवर म्हणून उपस्थित होते.

.     यावेळी आदिवासींच्या समाज आणि महिला यांच्यावर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. तसेच वीर बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनात मान्यवरांनी प्रकाश टाकला. यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रात्रीला पारंपरिक आदिवासी गोंडी ढेंमसा नुत्याचेआयोजन करण्यात आले होते यात अनेक कलाकारांनी भाग घेतला होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त आदिवासी समाज मालेवाडा यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!