Home सामाजिक संविधान वाचेल तरच देश वाचेल : अशोक वानखडे

संविधान वाचेल तरच देश वाचेल : अशोक वानखडे

1282

वरोरा : सविधान जर चांगल्या लोकांच्या हातात राहील तरच देश संविधान नुसार चालेल, नाहीतर संविधान हे नुसतं पुस्तक बनवून राहील. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी सुद्धा अन्याय-अत्याचाराचा सामना करावा लागत असेल. देशातील काही राज्यात दलितांना घोड्यावरून वरात काढताना पोलिसांचे संरक्षण घ्यावे लागत असेल तर त्या मंगळयानाला चाटायचं का, विश्वगुरू म्हणून नुसत मिरवायचं का असे परखड मत राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे दिल्ली यांनी वरोरा येथील संविधान दिन कार्यक्रमात केले.

.      नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था बोर्डा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर चौक वरोरा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय बोधे, स्वागताध्यक्ष अॅड अरविंद पेटकर, उद्घाटक डॉ उन्मेष भुजाडे, प्रमुख उपस्थिती अॅड भुपेंद्र रायपुरे तर मुख्य मार्गदर्शिक म्हणून अशोक वानखेडे, नवी दिल्ली हे होते.

.        या यावेळी पुढे बोलताना अशोक वानखेडे म्हणाले जनतेपेक्षा मोठा कोणी नाही. ही राज्यघटना जनतेने जनतेला समर्पित केलेले डॉक्युमेंट आहे. ती आपली आहे कोणाच्या बापाचं नाही, त्यानुसार कारभार होत नसेल तर आपण त्यांना ठेचले पाहिज. देशावर मोठं कर्ज होत आहे. देशात उद्योगपतीकडून शोषण होत आहे. संविधानुसार देश चालवण्यासाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी जनजागरण केलं पाहिजे.

.      आता मला एकाच ठिकाणी विश्वास आहे तो म्हणजे जनता जनार्दन जनतेची ताकद खूप मोठी आहे जनतेच्या सुनामी पुढे कोणीच टिकणार नाही राजकीय लोक असेच पडून जातील. पुढच्या काळात संविधान दिनासारखे आयोजन होतील की नाही याबद्दल मला शंकाच वाटत आहे त्यामुळे जनतेने जागृत होणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नांना साखर करायची असेल तर सर्वांनी जागृत होणे गरजेचे आहे. संविधान असतानाही जर तुम्ही गुलाम झाले तर संविधानच काय धरतीवर कोणीच तुम्हाला वाचवायला येणार नाही.

.      आता तुम्ही गुलामीकडे निघत आहात. जर तुम्हाला गुलामीकडे जायचं नसेल तर संविधानाचं रक्षण करणे हे फार महत्वाचे आहे जर संविधान वाचेल देश वाचेल आणि तुम्हा आमचे अधिकार हक्क अबाधित राहतील असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालन संजय नळे, प्रास्ताविक प्रकाश गायकवाड तर आभार गुलाब बागेसर यांनी केले.

error: Content is protected !!