Home सामाजिक संविधानाच्या तत्वाचे पालन करण्याची सर्वांची जबाबदारी

संविधानाच्या तत्वाचे पालन करण्याची सर्वांची जबाबदारी

1301

वासेरा येथील संविधान दिनाच्या कार्यक्रमातून मान्यवरांचे मनोगत

सिंदेवाही : भारतीय संविधान हे सर्व धर्मांना समान न्याय देते. भारतीय संविधानाने हक्क दिले आहेत. त्याच बरोबर त्यांचे कर्तव्य सुद्धा ठरविण्यात आले आहेत. आपण सर्वांनी धर्मनिरपेक्षतेचे पालन करून प्रत्येक धर्म , पंथ, आणि संस्कृतीचा आदर करून संविधानाच्या तत्वाचे पालन करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असल्याचे मत वासेरा येथे संविधान दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.

.        सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील युवा मित्र मंडळींनी एकत्र येऊन सनम मेश्राम यांचे पुढाकारात संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता श्रावस्ती बुद्ध विहार परिसर येथे संविधान दिनाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्ध नगर कमेतटी अध्यक्ष सुभाष रामटेके, प्रमुख मान्यवर म्हणून बौद्ध समाज नगर कमेंटीचे माजी सचिव महेंद्र कोवले, रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अस्मिता प्रवीण रामटेके, उपाध्यक्षा सारिका धनपाल कोवले, सचिव रजनी भास्कर कोवले, इंजिनियर प्रज्ञासागर कोवले, नगर कमिटी कोषाध्यक्ष रितेश सूर्यवंशी, सदस्य राहुल कोवले, इंजिनियर अमर रामटेके, इत्यादी मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

.        त्यांनतर उपस्थित मान्यवरांनी संविधान दिनाचे महत्व, संविधनाबाबत नागरिकांचे कर्तव्य, आणि जबाबदारी, आणि भारतीय संविधानाचे तत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कोवले , संचालन प्रणय कोवले, तर रोहिणी कोवले हीने सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे शेवटी भारतीय संविधानाची प्रास्ताविकाचे वाचन  करून उपस्थित सर्व महिला पुरुषांनी शपथ ग्रहण केली. त्यांनतर बुद्ध वंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

.         कार्यक्रमा नंतर महाप्रसादाचे  वितरण करण्यात आले. रात्री प्रबोधन कलामंच यांचा बुद्धभिम गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने सनम मेश्राम, विल्सन कोवले यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाला बौद्ध समाज बांधव, भगिनींनी उपस्थिती दर्शविली होती.

error: Content is protected !!