अवैध दारू विक्री विरोधात एल्गार

103
  • धानोली येथील ग्रामपंचायत व गावकर्‍यांची पोलिस स्टेशन वर धडक
भद्रावती
             तालुक्यातील धानोली येथे अवैध दारू विक्रीने पुरता उच्छाद माजविला आहे. परिणामी अनेक संसार उघड्यावर येत कौटुंबिक कलहात वाढ होत आहे. अवैध दारू विक्री विरोधात धानोली येथील नागरिकांनी एल्गार पुकारत वरोरा पोलिस स्टेशन वर धडक दिली. यावेळी अवैध दारू विक्रीला लगाम लावण्या संबंधीचे निवेदन देण्यात आले.
             यावेळी निवेदन देताना धानोली चे सरपंच मेहता, उपसरपंच ज्ञानेश्वर खापणे, पोलिस पाटील पोतराजे, तंटामुक्त समिती चे अध्यक्ष अश्विन विधाते, अमीर बोढे, रवींद्र ढुमने, गिरीधर धांडे, वैभव देरकर, अमोल देरकर, कैलास खापणे, नितीन मेहता, गजानन खापणे, तुषार बोढे, आशिष काळे, हनुमान जांभुळकर व इतर गावकरी उपस्थित होते.