नेरी : प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे जिल्हा परिषद चंद्रपूर तथा प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी आणि अवंती ऑप्टिकल्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर दि 23 ऑक्टोबर ला घेण्यात आला यात अनेक रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटप करुन शिबिर संपन्न करण्यात आले.
. सदर शिबिराला नेत्रचिकित्सक डॉक्टर मेहुल जोशी प्रमुख म्हणून उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुगांनाची तपासणी करण्यात आली. यात एकूण 515 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच सर्व लाभार्थ्यांना चष्मे देण्यात आले. आणि102 लाभार्थ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
. सदर शिबिराला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगर साहेब, डॉक्टर मनोज तेलमासरे, यांनी सेवा दिली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्त कर्मचारी अशा स्वयंसेविका तसेच अवंती ऑप्टिकल चंद्रपूर यांच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्या सहकार्याने यशस्वी पार पडले.


