Home पोलीस डायरी नागभीड पोलीसांची अवैध हातभट्टीवर धाड

नागभीड पोलीसांची अवैध हातभट्टीवर धाड

1317

एक लाखाचा मुद्देमाल जप्त

नागभीड : आगामी विधानसभा निवडणुक शांततेत व भयमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडण्याचे दुष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हाभर अवैध धंद्या विरोधात धाडसत्र सुरु आहे. नागभीड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या हातभट्टीवर नागभीड पोलिसानी धाड टाकून 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत दोन जणांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

.      प्राप्त माहितीनुसार पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे, प्रभारी अधिकारी रमाकांत कोकाटे पोलीस स्टेशन-नागभीड यांचे मार्गदर्शनात नागभीड पोलीसानी पोलीस स्टेशन-हद्दीत विशेष धाड मोहीम राबवुन मौजा काम्पा मांगली शेतशिवारात लपुन छपुन सुरु असलेल्या हातभट्टीवर धाड टाकली. दरम्यान 5 हजार रुपये किमतीचे, 10 लिटरचे पाच प्लास्टीक कॅन मधे गाळलेली हातभट्टी मोहा दारु एकुण 50 लिटर 90 हजार रुपये 40 प्लास्टीक चुंगळीत मोहा फुल सळवा प्रत्येक चुंगळीत 50 किलो प्रमाणे एकुण 2000 किलो मोहा फुल सळवा 3 हजार 509 रुपये सात लोखंडी ड्रम हातभट्टी मोहा दारु गाळने करीता वापरात येणारे, टील चाटु हातभ‌ट्टी मोहा दारु गाळने करीता वापरात येणारे, 5)50 रुपये प्लास्टीक हिरवा फाईप 5 फुट लांबीचे हातभ‌ट्टी मोहा दारु गाळने करीता वापरात येणारे, सातशे रुपये टिनाचे पिंप हातभट्टी मोहा दारु गाळने करीता वापरात जर्मन घमेले हातभट्टी मोहा दारु गाळने करीता वापरात येणारे, 500/- रु दोन मन हातभट्टी मोहा दारु गाळने करीता वापरात येणारे जळाऊ लाकुड असा एकुण 1,लाख चारशे पन्नास रुपये चा माल पकडला. सि.ए. सॅम्पल काढुन पकडलेला मुद्देमाल मौक्यावर पंचासमक्ष नाश केला. अवैध हातभट्टी चालविनारे रविंद्र धनराज अलोने वय 34 वर्ष धंदा-मजुरी रा. वार्ड क्र 3 काम्पा ता. नागभीड जि. चंद्रपुर,विलास सुर्यभान खोब्रागडे वय 37 वर्ष धंदा-मजुरी रा. वार्ड क्र 3 काम्पा ता. नागभीड जि. चंद्रपुर याना ताब्यात घेवुन त्यांचेवर अपराध क्रमांक ३५४/२०२४ कलम ६५ (इ), ६५ (फ), ६५ (क) म.दा. का. गुन्हा नोद केला आहे.

.     सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांचे मार्गदर्शनात पो. हवा. रुपेश मुल्लेमवार, संजय रामटेके, पो.अं. किशोर देशमुख, यानी केली.

error: Content is protected !!