Home सामाजिक हजारो बौद्ध अनुयायी ऐतिहासिक दीक्षाभूमीत दाखल

हजारो बौद्ध अनुयायी ऐतिहासिक दीक्षाभूमीत दाखल

1299

चंद्रपुरात धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी सजली दीक्षाभूमी

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या ऐतिहासिक दिनानिमित्त मंगळवार (दि. १५) ते बुधवार (दि. १६) रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ होणार असल्याने दीक्षाभूमी सज्ज करण्यात आली आहे.

.      डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरातील दीक्षाभूमीला आकर्षक रंगरंगोटी व रोषणाई करण्यात आली. पुस्तकांचे स्टॉल्स, शासनाचे विविध विभाग व समाजसेवी संघटनांनी आपापले स्टॉल्स आरक्षित केले. मुख्य रस्त्यांवर विविध संघटनांचे शुभेच्छा फलक लागले. समारंभाची पूर्ण तयारी झाली असून स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली.

आज बाबासाहेबांची अस्थिकलश मिरवणूक – बुधवारी (दि. १६) सकाळी १० डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिधातूकलशाची समता सैनिक दलाच्या पथसंचलनासह शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.

error: Content is protected !!