वरोरा : रेल्वे संबंधित विविध मागण्यांबाबत वरोरा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांसोबत विभागीय रेल्वे प्रबंधक (वाणिज्य) अमन मित्तल यांनी १५ ऑक्टोबरला सकारत्मक चर्चा केली. यामुळे प्रवासी संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
. मागील १७ वर्षांपासून रेल्वेविषयक विविध मागण्या प्रलंबित आहेत, कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे आजतागायत बंद आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची ससेहोलपट होत आहे, यावर चर्चा करण्यात आली. या सोबतच रेल्वे स्टेशन फलाटावर प्रवाशांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची माहिती देण्यात आली. त्यावर विभागीय रेल्वे प्रबंधक सहमत झाले आणि सर्व बारा मागण्यां रास्त असल्याने स्वतः पुढाकार घेऊन वरिष्ठांकडे मांडणार असल्याचे आश्वस्त केले.
. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेशी निगडित समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन राजेंद्र मर्दाने यांनी केले असून मुख्य महाप्रबंधक यांची मुंबई येथे व रेल्वे मंत्री महोदयांची लवकरच दिल्ली येथे भेट घेणार असल्याचे सांगितले.
. यावेळी शिष्टमंडळात प्रवीण गंधारे, खेमचंद नेरकर, शाहिद अख्तर,अमोल पाटील, मध्य रेल्वे नागपूर चे विभागीय वाणिज्य निरीक्षक मंगेश तितरमारे, आरपीएफ चे हेड कॉन्स्टेबल सैय्यद आबीद उपस्थित होते.


