गडचांदूर : अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कंपनीच्या सीएसआर फंडातून नोकारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
. यावेळी माणिकगड युनिट प्रमुख अतुल कंसल, वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत व विभागप्रमुख नवीन कौशिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळा नोकारी येथील टिन शेड बांधकाम कामाचे भूमिपूजन पारंपारिक पध्दतीने सरपंच मनीषा पेंदोर, उपसरपंच वामन तुराणकर व शाळेचे मुख्याध्यापक राठोड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
. यावेळी नोकारी गावचे ग्रामसेवक, शाळा प्रशासन अध्यक्ष, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.या कामामुळे शालेय विद्यार्थ्यांना पावसात किंवा उन्हात या शेडचा लाभ घेता येईल व सुरक्षित वाटेल असे सांगून शिक्षकांनी माणिकगडचे आभार मानले. सरपंच मनीषा पेंदोर यांनीही या सीएसआर कार्याचे मनापासून कौतुक केले.


