Home सामाजिक संविधानाचे संरक्षण सामुहिक जबाबदारी – प्रा. श्याम मानव

संविधानाचे संरक्षण सामुहिक जबाबदारी – प्रा. श्याम मानव

1320

बल्लारपुरात पार पडला ओबीसी परिषद

ओबीसी यौद्यांचा करण्यात आला सत्कार

विसापूर : भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. संविधानामुळे आपणास अधिकार मिळाले आहे. आजघडीला संविधानात्मक बाबीवर प्रहार केला जात आहे. संविधानाची चौकट नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजमनावर विपरीत परिणाम होत आहे. राजकीय, सामाजिक व आर्थिक मार्ग अडवला जात आहे. आता आपल्याला संविधान संरक्षण करण्यासाठी सामुहिक जबाबदारी स्विकारावी लागेल. तरच संविधान कायम राहील, असे विचार प्रसिद्ध वक्ते, राजकीय विश्लेषक आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी बल्लारपुरात ओबीसी परिषदेत सोमवार (दि.१४) रोजी मांडले.

.       बल्लारपूर येथील राजे बल्लाळशाह नाट्यगृह येथे बहुजन समता पर्वाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय घाटे यांच्या माध्यमातून ओबीसी परिषद, ओबीसी यौद्यांचा सत्कार आणि प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी संविधान बचाव ! महाराष्ट्र बचाव !! परिषदेत ते बोलत होते.

.       ओबीसी परिषदेचे उदघाटन विधानपरिषदेचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव भांडेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.श्याम मानव, आयोजक डॉ. संजय घाटे, डॉ. रजनी हजारे, ॲड. मेघा भाले, सत्कारमूर्ती म्हणून ओबीसी यौद्धे रविंद्र टोंगे, भुजंग ढोले, सुरेश कावळे, ॲड. अंजली साळवे, उमेश कोर्राम यांची मंचावर उपस्थिती होती.

.       प्रा. श्याम मानव म्हणाले, संविधानात समता, न्याय, बंधुत्वाचा, स्वातंत्र्याचा समावेश आहे. याच तत्वावर देशाचा व राज्याचा कारभार चालविला पाहीजे. मात्र, राज्यकर्त्यांनी संविधानाला डावलून कारभार चालविला आहे. ही बाब सर्वसामान्य माणसांचे हक्क हिरावणारी आहे. संविधानाचा ढाचा कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण जागृत झालो पाहीजे. एक मत, एक मूल्य, याचा प्रभाव टाकला पाहिजे. मस्तवाल राज्यकर्त्यांना संविधानाचे महत्व लक्षात आणून देण्यासाठी हाच मार्ग आहे, असे प्रा. श्याम मानव परखड विचार व्यक्त केले.

.       दरम्यान ओबीसी आरक्षण संदर्भात प्रभावी भूमिका घेऊन आंदोलन करणारे रविंद्र टोंगे, भुजंग ढोले, सुरेश साळवे, ॲड. अंजली साळवे आणि उमेश कोर्राम यांचा मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी सर्व समाजातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.

आपणाला सामाजिक न्यायाची लढाई लढावी लागेल – डॉ. संजय घाटे                                                                                                            आपण शहरी व ग्रामीण भागात विभागले आहोत. सिंचन सुविधांचा अभाव आहे. परिणामी शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. उद्योगामुळे प्रदूषण समस्या आहे. यातून आरोग्य समस्या वाढत आहे. आपले क्षेत्र जंगलव्याप्त असल्याने मानव – वन्य प्राणी संघर्ष निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातून आपणास लढाई लढावी लागणार असून ओबीसींच्या न्यायासाठी व संविधानाच्या बचावासाठी आपला संघर्ष सुरू राहणार असल्याचे मत ओबीसी परिषदेचे आयोजक व ओबीसी महापरिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे यांनी प्रास्ताविकात भूमिका मांडली.

error: Content is protected !!