नागभीड : तालुक्यातील पारडी – मिंडाळा – बाळापुर जि.प. क्षेत्रातील चिंधीचक येथील आंगणवाडी केंद्र क्र. १ च्या नवीन ईमारतीचे लोकार्पण नुकतेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांचे हस्ते पार पडले.
. या समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून चिंधीचक ग्रा.पं. चे सरपंच हरिदास वरठे, उपसरपंच प्रदीप समर्थ व भाजपा तालुका सरचिटणीस जगदीश सडमाके यांची प्रमुख उपस्थिती होती. नियोजित उद्घाटक आमदार बंटी भांगडिया यांनी शुभेच्छा संदेश पाठवले.
. चिंधीचक येथील जुनी अंगणवाडी निर्लेखित केल्यामुळे विद्यार्थ्यांना इतर ईमारतीत बसवावे लागत होते. हि अडचण लक्षात घेत माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी आमदार बंटी भांगडिया यांच्या माध्यमातून जिल्हा निधीतून अंगणवाडीच्या नवीन नवीन ईमारत बांधकामाला परवानगी प्राप्त करून घेतली. नुकत्याच या ईमारतीचे लोकार्पण पार पडले. त्यामुळे बाला पेंटीगसह उपलब्ध झालेली अंगणवाडीची हि प्रशस्त ईमारत मिळाल्याने यावेळी उपस्थित चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हि ईमारत उपलब्ध केल्याबद्दल गाववासियांनी आ. बंटी भांगडिया व माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांचे आभार मानले आहे.
. या लोकार्पण प्रसंगी शासकीय आश्रम शाळा, चिंधीचकचे मुख्याधापक आकुलवार, जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याधापक बावणे, चिंधीमालचे पोलीस पाटील प्रदीप धारणे, ग्रा.पं. सदस्य रोहिणी जीवतोडे, भावना लेनगुरे, भारती धारणे, विश्रांती सातपैसे, आंगणवाडी सेविका माधुरी दडमल, मदतनीस दर्शना गजभे, ज्येष्ठ नागरिक विनोद नागोसे, शिपाई राजेंद्र माहुरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन चिंधीचक ग्रा.पं. चे ग्रामसेवक रतनजी वासे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजु सहारे यांनी मानले.


