Home सामाजिक प्रधानमंत्र्याची कल्पना नंदोरीत साकार – हंसराज अहिर 

प्रधानमंत्र्याची कल्पना नंदोरीत साकार – हंसराज अहिर

1366

शेतकरी उत्पादक कंपनी तथा तक्रार समाधान केंद्र कार्यालयाचे उद्घाटन

हजारो शेतकर्‍यांची उपस्थिती

चंद्रपुर : शेतकर्‍यांच उत्पादन वाढल आणि भावच नाही मिळाला तर काय करणार.  भाव पाहिजे खरेददारी पाहिजे आणि खरेददारी पासून भाव पण योग्य मिळाला पाहिजे.  उत्पादनात वाढ झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन प्रधानमंत्री महोदयांनी  घेतलेली काम याला यश आले आहे. कापसापासून हरभर्‍या पर्यंत चांगले भाव सरकारनी हमीभाव वाढविला. नरेंद्र जीवतोडे यांनी आपली कंपनी स्थापन केली. गावात जाऊन आपला माल शेतकर्‍यांनी विकला पाहिजे, भाव योग्य आला पाहिजे. आपल उत्पादनाच  प्रोसेसिंग केल पाहिजे. व्यापार्‍याच्या माध्यमातून उत्पादन विकण्यापेक्षा आपल्या शेतकर्‍यांच्या कंपन्या स्थापन करून विका ही  प्रधानमंत्र्यांची कल्पना नंदोरी गावात  साकार होत आहे. असा विश्वास भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केला.

.        चंद्रपुर नागपुर महामार्गावरील शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ चंद्रपुरच्या कार्यालयाचे तथा शेतकरी तक्रार समाधान केंद्र कार्यालयाचे उद्घाटन भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता पार पडले.

.        या शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या शेतात तयार होणारे पिके थेट ग्राहकांपर्यंत विक्रीस उपलब्ध राहणार आहे. तर शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा या करीता स्टोरेज तयार करण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून आता शेतकर्‍यांना आपल्या पिकांचा योग्य मोबदला मिळणार आहे. तर शेतकर्‍यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. मात्र प्रशासनाकडून, प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य अमलबजावणी होत नसल्याने अनेक योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचतच नाही. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत 2,000 रुपये देण्यात येतात. मात्र या योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकर्‍यांना मिळत नाही. काही शेतकर्‍यांची प्रकरणे त्रुटीत आहे. या सोबत अनेक योजनांचे प्रशासनाकडून शेतकर्‍यांचे समाधान होत नाही. यामुळे शेतकर्‍यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होत असल्याने या शेतकरी उत्पादक कंपनीत शेतकर्‍यांसाठी शेतकरी समाधान तक्रार केंद्र कार्यालय उघडण्यात आल्याचे शेतकरी उत्पादक कंपनी चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी यावेळी सांगितले.

.        या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, डॉ. सागर वझे, किशोर टोंगे, रमेश राजूरकर, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप महाकुलकर, चंद्रकांत गुंडावार, संजय लोहकरे, नितिन मेहता, विजय वानखेडे, अफजल भाई, सुनील नामोजवर, पंचायत समिती माजी सभापती प्रवीण ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ते दादा झाडे, चंद्रपुर शेतकरी उत्पादक महासंघ चे पदाधिकारी बालाजी धोबे, सतीश बावणे, बळीराम डोंगरकर, संदीप एकरे, प्रकाश निब्रड गावातील सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा महिला मंडळ सह वरोरा-भद्रावती तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव व महिला उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे संचालन व आभार संदीप झाडे यांनी मानले.

error: Content is protected !!