- पारस कॉटन वरोरा येथील घटना
वरोरा
. वरोरा शहरातील पारस कॉटन मध्ये काम करीत असलेल्या महिलेला कापूस उचलणी करणाऱ्या ट्रॅक्टर ने चिरडल्याची घटना दि 8 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. रेखा वसंता राऊत (60) रा अभयंकर वॉर्ड वरोरा असे मृतक महिलेचे नाव आहे.
. प्राप्त माहिती नुसार वरोरा शहरालगत असलेल्या मार्डा रोडवर पारस कॉटन कापूस खरेदी केंद्र आहे. सद्या शेतकऱ्यांचे पिके निघाले नाही. पण लवकरच सोयाबीन आणि कापूस पीक निघणार आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्राची पूर्व तयारी म्हणून पारस कॉटन जिनिंग मध्ये साफ सफाई च्या कामाला वेग आला आहे. या जिनिंग मध्ये महिला व पुरुष असे मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात. 8 ऑक्टोबर रोजी जिनिंग परिसरात असलेले गवत व कचरा पावडा लावलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच 34 बीफ 0530 ने काढणे सुरु होते. दरम्यान त्याच जागेवर एक 60 वर्षीय महिला खाली बसून काम करीत होती. ट्रॅक्टर ला समोर पावडे लावले असल्याने त्या ट्रॅक्टर चालकाला ती महिला दिसली नसल्याने खाली बसलेल्या महिलेला ट्रॅक्टर ने फरफटत नेले यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठत मोका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. ट्रॅक्टर चालकावर वरोरा पोलिसात गुन्हा दाखल करून अपघातग्रस्त ट्रॅक्टर वरोरा पोलिसांनी जप्त केल्याचे समजते.
मृतक महिलेची परिस्थिती हलाकीची असल्याने त्या महिलेच्या परिवाराला जिनिंग मालकांनी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.


