सामाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे यांच्या प्रयत्नांना यश
टेमुर्डा
“पाऊस आला धावून पुल गेला वाहून” या मथळ्याखाली सामाजिक कार्यकर्ता किशोर डुकरे यांनी दैनिक नवजीवन मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत बोरगाव ते आसाळा रस्त्यावरील पुलियाचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याने या मार्गावरील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला . जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बोरगाव (दे )ते आसाळा या मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात आले होते मात्र अल्पावधीतच पाण्याच्या प्रवाहाने पुल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला . याकडे जिल्हा परिषद च्या अधिकाऱ्यांनी ने लक्ष देऊन संबंधित पुलाचे लवकरात लवकर बांधकाम करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे तसेच परिसरातील शेतकरी, नागरिक यांनी केली होती. किशोर डुकरे यांच्या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सदर पुलाचे बांधकाम पूर्ण केल्याने शेतकरी व गावकरी यांच्यात आनंद व्यक्त होत आहे .


