- टोल कंपनीच्या अधिकार्याचे बांधकाम विभागाकडे बोट
- लोकप्रतिनिधी , प्रशासकीय यंत्रणा उदासीन
चंद्रपुर
वाहतूक कोंडी मुळे नेहमीच चर्चेत असलेल्या चंद्रपुर नागपुर महामार्गावरील नंदोरी टोल नाका आता बळीराज्या साठी आणि दुचाकी वाहन धारकासाठी डोके दुखी ठरू लागला आहे . वाहनाच्या कचाट्यात बैलबंडी अडकल्याचे वृत्त दैनिक नवजीवन ने प्रकाशित केल्यानंतर शेतकर्याचे नेते किशोर डुकरे यांनी टोल कंपनीच्या अधिकार्याशी चर्चा केल्या नंतर अधिकार्यानी चक्क बांधकाम विभागाकडे बोट दाखवीत बांधकाम विभागाने सांगितले तर शेतकर्यासाठी मार्गीका खुली करू असे सांगितल्याने आता बांधकाम विभाग शेतकर्यांच्या समस्येबाबत काय निर्णय घेतात याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे .
चंद्रपुर नागपुर महामार्गालगत असलेल्या नंदोरी येथील बहुतांश शेतकर्यांची शेतजमीन नदी पड्याल असल्याने शेतात जाण्यासाठी शेतकर्यांना नंदोरी चा टोल नाका पार करूनच जावा लागतो . बैलबंडी असो की शेतकर्यांच्या जनावरांचा कळप असो याच मार्गाने जावे लागतात . नंदोरी टोल नाक्याला अंदाजे ९ वर्ष झाली . मात्र यावर्षी वाहनाची कोंडी ही नित्याचीच झाल्याचे दिसून येत आहे . त्याचे कारणही तसेच आहे . दिवसेंदिवस आधुनिकीकरण व नव नवीन तंत्रज्ञान आले आहे . त्यात ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गाने होत आहे . टोल नाक्याच्या मार्गीकावर वाहन पोहचल्या नंतर वाहनात ओव्हरलोड अधिक असल्याचे टोल कर्मचार्याकडून सांगितल्या नंतर वाहन धारक व टोल कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये वाद होत असून वाहन या मार्गीकामधून त्या मार्गीका मध्ये घेण्यास सांगितले जात असल्यामुळे वाहनाच्या रांगाच रांगा लागत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचे एका वाहनधारकाने आमच्या प्रतींनिधी ला सांगितले . प्रत्यक्षात हा अनुभव अनेकांनी अनुभवला आहे .
टोल कंपनीच्या अड्डेलतट्टु धोरणामुळे आज नंदोरी येथील बळीराजाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . सोबतच दुचाकी जाण्यासाठी सुद्धा अरुंद रस्ता ठेवल्या गेल्या मुळे अनेक दुचाकीस्वार पडून अपघात घडत आहे . चंद्रपुर नागपुर हा महामार्ग असल्याने दररोज हजारो वाहनाची रेलचेल याच मार्गाने होत असतात . एखादा मंत्री किंवा आमदार, खासदार या मार्गाने येणार जाणार असल्यास टोल कंपनीचे कर्मचारी तत्पर राहत रस्ता मोकळा करतात मात्र शेतकर्यांची जनावरे किंवा बैलबंडी जात असेल तर टोल कंपनीचे कर्मचारी याकडे लक्ष देण्याऐवजी ओव्हरलोड असलेल्या वाहना भोवताल जमा असल्याचे दिसून येते . त्यामुळे टोल कर्मचारी व कंपनी शेतकर्यांबाबत किती तत्पर आहे हे दिसून येतात . आणि लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग सुद्धा टोल कंपनी वर मेहरबान असल्याचे चित्र दिसून येत असल्याने बळीराजाने कुणाला दाद मागावी हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित असल्याचे दिसत आहे .
शेतकर्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही टोल कंपनीने शेतकर्यांची जनावरे व शेतकर्यांची बैलबंडी जाण्यासाठी सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत एक मार्गिका खुली करून दिली पाहिजे . ही शेतकर्यांची शेतात जाण्या- येण्याची वेळ आहे . या दरम्यान या मार्गीकेतून कोणतेही वाहन गेले पाहिजे नाही . अशी टोल कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण पाटील यांना सांगितले तर बांधकाम विभागाचे अधिकारी मत्ते यांना सुद्धा सांगण्यात आले . तर वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा शेतकर्यांच्या समस्या सांगितल्या आहेत . याकडे टोल कंपनी व बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले व शेतकर्याना किंवा शेतकर्यांच्या जनावरांना कोणतीही इजा किंवा नुकसान झाले तर शेतकर्यांना घेऊन आंदोलन छेडणार असून शेतकर्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही . किशोर डुकरे, शेतकरी नेता , वरोरा
काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी महिना भरापासून टोल मार्गिका मध्ये काम सुरू आहे . त्यामुळे एखादी वेळ वाहतूक कोंडी होत असते . यात शेतकर्यांची जनावरे किवा बैलबंडी अडकल्यास ते आम्ही काढून देत असतो . फक्त एक दिवस बैल बंडी अडकली होती . शेतकर्यांना जाण्या येण्यासाठी दोन फ्री मार्गिका आहे . तरीपण बांधकाम विभागाने आम्हाला सांगितले तर आम्ही शेतकर्यांसाठी मार्ग करून देऊ. प्रवीण पाटील, व्यवस्थापक. टोल कंपनी, नंदोरी


