Home विदर्भ टोल नाक्याच्या वाहतूक कोंडीत भरडला जातो बळीराजा 

टोल नाक्याच्या वाहतूक कोंडीत भरडला जातो बळीराजा

852
  • टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कधी दूर होणार ? 
  • लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय.?

रवी खाडे

चंद्रपुर

चंद्रपुर नागपुर महामार्गावरील वरोरा शहरालगत असलेला नंदोरी येथील टोल नाका मागील काही महिन्यापासून वाहतुकीच्या कोंडीने चर्चेत आहे . ओव्हरलोड वाहतुकीच्या नावाखाली टोल कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात नेहमीच तु तू – मै मै होत असते . परिणामी एक ते दोन किलोमीटर पर्यंत आडव्या तिडव्या वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या असतात . यात मात्र भरडल्या जातो तो म्हणजे बळीराजा . तासनतास बैल बंडी घेऊन वाहनाच्या रांगेत बळीराजाला उभे राहावे लागत असतांनाही या बळीराजाची कोणालाही किव येत नाही का ? बळीराजाला वेठीत धरणार्या या टोल कंपनी विरुद्ध आवाज उचलण्याची लोकप्रतिनिधींना हिम्मत उरली नाही का ? हे मात्र खरे !

चंद्रपुर नागपुर महामार्गावरील भद्रावती तालुक्यातील नंदोरी या गावात जवळपास ९० टक्के नागरिक शेतकरी आहेत आणि याच गावा अंतर्गत टोल नाका उभारण्यात आला आहे . टोल नाका उभारणी वेळेस आपली वाहने कशी मोफत होईल यासाठी लोकप्रतींनिधींनी आंदोलने केली . वाहने फ्री झाली मात्र एका ही लोकप्रतींनिधींनी शेतकर्यांोचा विचार केला नाही . टोल नाक्याच्या पलीकडे ४० टक्के नंदोरी येथील शेतकर्यांनची शेती आहेत त्यांना शेतात जाण्यासाठी टोल नाका पार करूनच जावे लागते . शेतकर्यां च्या बैल बंडीला व जनावराना जाण्या- येण्यासाठी वेगळा मार्ग नसल्याने वाहनाची रांगच रांग राहत असल्याने बळीराजाला तासनतास ताटकळत राहावे लागत असतांनाही लोकप्रतिनिधींना दिसत नाही की अंधळ्याच सोंग घेऊन प्रवास करतात काय हे मात्र त्यांनाच ठाऊक . मात्र टोल नाका सुरू झाल्यापासून बळीराजा हे सगळं सहन करत आहे . शेतकर्यामच्या नावाने उदोउदो करणारे नेते कुठे गेलेत . दोन दिवसा अगोदर या टोल नाक्यावर अशीच वाहनाची रांग लागली होती . या वाहनाच्या रांगेत बैल बंडी घेऊन बळीराजा अगदी मधोमध फसला होता . वाहनांना बघून बैल दचकला असता तर त्या शेतकर्या वर किती मोठे संकट आले आहे . वाहनाच्या गर्दीत फक्त सामान्य माणूसच असतो काय ? अधिकारी , राजकीय पुढारी यांचे वाहने राहत नाही काय ? आजपर्यंत कुणालाच या बळीराजाची व्यथा कळली नाही काय हे मात्र सांगणे फार कठीण . त्याच दिवशी रस्ता सुरळीत करण्यासाठी जबाबदारी असणार्याक महामार्ग पोलिसांचे वाहन सुद्धा यात अडकले होते . त्यातील काही कर्मचारी वाहनातून उतरले मात्र टोल नाक्यावर ओव्हरलोड चा प्रश्न असल्याने ते सुद्धा फक्त वाहने रांगेत घ्या एवढेच करू शकले . नेहमी नेहमी वाहनाची कोंडी होत असताना या टोल नाका धारकावर अंकुश लावण्याचा अधिकार कुणालाच नाही काय ?

 

 

पडा आणि मरा : दुचाकीस्वाराची अवस्था 

या टोल नाक्यावर साधी दुचाकी जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात आला नाही . दोन्ही बाजूच्या मार्गिका नंतर अगदी दोन ते तीन फुटाचे अंतर दुचाकी वाहन जाण्यासाठी ठेवण्यात आले . त्यातही ब्यारिकेट लावले असतात तर कधी कधी टोल कर्मचारी रस्त्यावर उभे असतात . कर्मचार्यांनना हटकले तर ते भांडण करण्यास तयार असतात . आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार दुचाकी घेऊन पडले यात अनेक जण गंभीर जखमी झाले मात्र टोल नाका धारक सुधारत नाही आणि लोकप्रतिनिधी , प्रशासन लक्ष देत नाही . पडा आणि मरा अशी अवस्था दुचाकी स्वाराची झाली आहे .

error: Content is protected !!