काँग्रेस नेते राजू झोडे यांची मागणी
कोठारी : घुग्गुस येथील माउंट कारमेल कॉन्व्हेंट शाळेचे अदानी ग्रुपला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती तात्काळ थांबविण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन मागणी काँग्रेस नेते राजू झोडे यांनी एका निवेदनातून जिल्हाधिकारी यांना केली आहे.
. घुग्गुस येथील माउंट कारमेल कॉन्व्हेंट शाळेचे अदानी ग्रुपला हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही अतिशय संतापजनक प्रक्रिया असून याविरोधात आजी, माजी विद्यार्थी व पालकांनी रोष व्यक्त केला आहे. ही शाळा गुणवत्तापूर्ण योगदानासाठी ओळखली जाते असून या शाळेने अनेक विद्यार्थी घडविले आहे. त्यामुळे अदानी ग्रुपला ही शाळा हस्तांतरित झाल्यास येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असून सुरळीत सुरू असलेले संस्थांवर सरळ अतिक्रमण करणे अदानी समूहाचा डाव आहे. त्यामुळं ही शाळा अदानी समूहाला हस्तांतरित केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस नेते राजू झोडे, बापूभाई अंसारी, पंचशिल तामगाडगे, अनुरूप पाटिल, प्रफुल्ल मेश्राम यांनी दिला आहे.