Home सामाजिक अखिल भारतीय सैनिक शाळा स्पर्धेचे थाटात उदघाटन

अखिल भारतीय सैनिक शाळा स्पर्धेचे थाटात उदघाटन

1334

एअर मार्शल विजयकुमार गर्ग यांनी केला शुभारंभ

४२ सैनिक शाळेतील पाचशे स्पर्धक सहभागी

विसापूर : अखिल भारतीय स्तरावर सैनिक शाळा स्पर्धेचा आगाज सोमवारी विसापूर हद्दीतील चंद्रपूर सैनिक शाळेच्या मिल्खासिंग क्रीडांगणावर झाला. या स्पर्धेत देशभरातील ४२ सैनिक शाळेतील चारशे मुले आणि शंभर मुली असे एकूण पाचशे स्पर्धक सहभागी झाले आहे. या स्पर्धेचे शानदार व नेत्रदीपक उदघाटन समारंभ एअर मार्शल तथा एव्हीएस एम, व्हीएस एम,एअर ऑफीसर कमांडीग इन चिफ नागपूर येथील विजयकुमार गर्ग यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.

.       यावेळी ए पासून एच पर्यंतच्या खेळाडूंच्या तुकडीने एअर मार्शल विजयकुमार गर्ग यांना मानवंदना दिली. याप्रसंगी एअर व्हाइस मार्शल तथा व्हीएस, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्ही.एस.चौधरी, संरक्षण मंत्रालयातील सैनिक स्कूल सोसायटीचे निरीक्षण कमोडोर आर.के.शर्मा यांची उपस्थिती होती.

.       यावेळी एअर मार्शल विजयकुमार गर्ग म्हणाले, देश भरातील सैनिक शाळेतील उत्कृष्ट खेळाडू यात सहभागी झाले आहे. खेळाडूंनी सांघिक भावनेतून खेळाचे प्रदर्शन करावे. सांघिक प्रयत्नातील यश नाव लौकीकात भर टाकणारे आहे. आपापल्या शाळेचा गौरव वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची संधी ,ही क्रीडा स्पर्धा असल्याचे गौरवोदगार उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.या स्पर्धत अॅथलेटिक्स, हाकी, बास्केटबॉल, आणि व्हॉलीबॉल स्पर्धेसोबत सांस्कृतिक उपक्रमांची देखील रेलचेल राहणार आहे. दरम्यान आज उदघाटन समारंभ पार पडल्यावर २00 मिटर धावण्याची स्पर्धा मुलींच्या दोन गटात ,तर मुलांची एका गटात स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्यांना एअर मार्शल विजयकुमार गर्ग यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने आलेल्यांचा पदक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. या स्पर्धेचा समारोप २ आक्टोंबर २०२४ रोजी होणार असल्याची माहिती ,चंद्रपूर सैनिक स्कूल प्रशासनाने दिली आहे.

error: Content is protected !!