Home सामाजिक राजुऱ्याच्या राधिका दोरखंडे रासेयोचा विद्यापीठस्तरीय पुरस्कार

राजुऱ्याच्या राधिका दोरखंडे रासेयोचा विद्यापीठस्तरीय पुरस्कार

1308

2 ऑक्टोबरला राज्यपालांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

चंद्रपूर : राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रासेयो कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांना केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार देवून गौरविले जाते. त्याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठांतर्गत सन २०२४-२३ या वर्षासाठी विद्यापीठ स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातून एक महाविद्यालय एकक, एक रासेयो कार्यक्रम अधिकारी व रासेयो स्वयंसेवकांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला या पुरस्कारांमध्ये राजुऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयाने तीन पुरस्कार पटकाविले असून, विद्यापीठस्तरीय रासेयो स्वयंसेवक पुरस्कारासाठी शिवाजी महाविद्यालयातील राधीका दोरखंडे हिची निवड करण्यात आली आहे.

.      गोंडवाना विद्यापीठातून उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय म्हणून विद्यापीठस्तरीय पुरस्कारासाठी राजुऱ्याच्या श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हास्तरीय पुरस्कार चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयाला घोषित करण्यात आला आहे. उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी पुरस्कारासाठी विद्यापीठस्तरावर शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. गुरुदास बल्की तर जिल्हास्तरावर डॉ. कुलदीप गौंड यांची निवड करण्यात आली आहे. सर्व पुरस्कारप्राप्त कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व महाविद्यालयांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे २ ऑक्टोबर रोजी पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे.

error: Content is protected !!