Home सामाजिक गरजू, हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप

गरजू, हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप

1330

माजरी : कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माजरी येथे माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून गरजू, हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.

.       या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माजरी चे प्राचार्य श्रीकांत काळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हरिदास वैद्य, प्रा. प्रमोद कोल्हे हे होते.

.       प्रा. माहेश्वरी दिवाकर निंबाळकर यांच्या सोशलमिडियाचया माध्यमातून दरवर्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच सर्व माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माहेश्वरी दिवाक निंबाळकर या सोशलमिडीयाचया माध्यमातून असे उपक्रम दरवर्षी राबवित आहे आणि त्यांना माजी विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माहेश्वरी दिवाकर निंबाळकर, प्रास्ताविक प्रा. हरिदास वैद्य तर आभार प्रदर्शन प्रा. प्रमोद कोल्हे यांनी अतिशय उत्कृष्ट उदाहरण देऊन केले तर अध्यक्षीय मनोगत  श्रीकांत काळे यांनी केले.

.       यावेळी गजानन हनुमंते, प्रवीण मडावी, राजेश कानझोडे, शितल खांडेकर, प्राची रामटेके, उमा बोंडे, राहुल पानथवने, दीपाली चतुर, अश्विनी निमकर, सुनिल आसूटकर, देवयानी निंबाळकर, भालचंद्र साळवे, अदिती साळवे, गजानन निमकर यांच्या सहयोगातून, शालेय साहित्य वितरण चा कार्यक्रम घेण्यात आला.

error: Content is protected !!